घोडगंगा कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू

शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया नुकतीच जाहीर झाली आहे
Ghodganga Sugar Mill
Ghodganga Sugar MillAgrowon

पुणे : शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी कारखान्याची (Ghodganga Sugar Mill Election) पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया नुकतीच जाहीर झाली आहे. कारखाना कार्यक्षेत्रात निवडणुकीचे वारे वेगाने वाहत असून, आता सत्ताधारी आणि विरोधकांचा सामना लक्षवेधी ठरण्याची चिन्हे आहेत.

कारखान्याचे ३१ मार्च २०२१ अखेर ऊस उत्पादक (Sugarcane Grower) सभासद १९ हजार ३७३, तर संस्था सभासद २६००, असे एकूण सभासद १९ हजार ३९९ इतके आहेत. शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांची गेल्या पंचवीस वर्षांपासून कारखान्यावर एकहाती सत्ता आहे. ही सत्ता टिकवण्यासाठी आमदार जिवाची बाजी लावणार आहेत. तर विरोधक व भाजप ही सत्ता उलथवून लावण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे यंदाची कारखान्याची लढत चुरशीची होणार आहे.

शिरूर तालुक्यातील महत्त्वाची सहकारी संस्था असल्याने या निवडणुकीसाठी संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. कारखान्यावर आमदार अशोक पवार यांची सत्ता असली तरी या वेळी प्रथमच सर्वपक्षीय नेत एकत्र येत किसान क्रांती पॅनेल उभा केले आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

निवडणूक प्रक्रियेला वेग :

घोडगंगाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रक्रियेला वेग आला आहे. दि. २४ ते ३० जूनपर्यंत सकाळी ते ४ पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करणे, ३० जून रोजी दुपारी ४ वाजता कार्यालयात नामनिर्देशन पत्राची यादी प्रसिद्धी, १ जुलै रोजी कार्यालयात सकाळी ११ वाजता नामनिर्देशन पत्राची छाननी, दि. ४ ते १८ जुलै सकाळी ११ ते ४ पर्यंत नामनिर्देशन पत्र माघार घेण्याची वेळ, दि. १९ जुलै सकाळी ११ वाजता कार्यालयात उमेदवारांची अंतिम यादी व चिन्हवाटप, दि. ३१ जुलै सकाळी ९ ते ५ या वेळेत मतदान व दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता मतमोजणी व निकाल आहे.

आतापर्यंत सात अर्ज दाखल :

रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी सात जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शंकर कुंभार यांनी दिली. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष व आमदार अॅड. अशोक पवार यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दि. २४ जून रोजी संभाजी शिवाजी फराटे यांनी मांडवगण फराटा गटातून आमदार अॅड. अशोक पवार यांनी वडगाव रासाई गटातून दोन अर्ज, वाल्मीकी धोंडीबा कुरुंदळे यांनी गटातून, उत्तम रामचंद्र सोनवणे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील, सुजाता अशोक पवार यांनी महिला राखीव व वडगाव रासाई या मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com