Grampanchayat Election : जिल्ह्यातील ३१९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित झालेल्या ३१६ तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकांमधून वगळलेली एक व २०२१ मधील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एकही नामनिर्देशनपत्र प्राप्त न झाल्यामुळे कार्यकारणी गठीत न झालेल्या दोन अशा एकूण ३१९ ग्रामपंचयातींच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर करण्यात आला आहे.
Grampanchayat Election
Grampanchayat ElectionAgrowon

सातारा : ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित झालेल्या ३१६ तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकांमधून (Gram Panchayat Election) वगळलेली एक व २०२१ मधील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एकही नामनिर्देशनपत्र प्राप्त न झाल्यामुळे कार्यकारणी गठीत न झालेल्या दोन अशा एकूण ३१९ ग्रामपंचयातींच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने (Election Commission) जाहीर करण्यात आला आहे.

Grampanchayat Election
Grampanchayat Election : दिवाळीनंतर रंगणार ग्रामपंचायतींची रणधुमाळी

सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून या ग्रामपंचयातींच्या क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू होणार आहे. इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी २८ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. दोन डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

उमेदवारी अर्ज छाननी पाच डिसेंबरला होणार आहे. अर्ज मागे घेण्याची तारीख सात डिसेंबर आहे. अर्ज माघारीनंतर त्याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करणार आहे. या ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. तर २० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com