Grampanchayat Election : राज्यातील ११६६ ग्रामपंचायतींच्या तेरा ऑक्टोबरला निवडणुका

राज्यातील १८ जिल्ह्यांतील ११६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १३ ऑक्टोंबर रोजी घेण्यात येणार आहेत. या निवडणुकीत थेट सरपंच पदाची निवडणूक होणार आहे.
State Election Commission
State Election CommissionAgrowon

मुंबई : राज्यातील १८ जिल्ह्यांतील ११६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका (Grampanchayat Election Maharashtra)ः १३ ऑक्टोंबर रोजी घेण्यात येणार आहेत. या निवडणुकीत थेट सरपंच पदाची निवडणूक (Sarpanch Election Maharashtra) होणार आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे सरकारने थेट सरपंच निवडीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या निवडणुकीत थेट सरपंच निवड होणार आहे.

State Election Commission
Soybean Rate : दर पाडण्यासाठीच वायदे बंदीला ‘सोपा’चे समर्थन

‘‘१८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होतील,’’ अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.

मदान म्हणाले, ‘‘निवडणुकीसाठी संबंधित तहसीलदार १३ सप्टेंबर रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. २१ ते २७ सप्टेंबर दरम्यान अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. शनिवार आणि रविवारची सुट्टी असल्याने २४ व २५ सप्टेंबर रोजी अर्ज दाखल करता येणार नाहीत. २८ सप्टेंबर रोजी अर्जांची छाननी होईल. ३० सप्टेंबर रोजी दुपारी ३ पर्यंत अर्ज माघारी घेता येतील. त्यानंतर चिन्हांचे वाटप होईल. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी तीन वाजेपर्यंतच मतदान होईल. १४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल.’’ ओबीसी समाजाला प्रतिनिधित्वावरून राज्यात मोठ्या घडामोडी घडल्या. या निवडणुकीत समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा निश्चित करण्यात येतील.

State Election Commission
APMC Election: राज्यातील २८१ बाजार समित्यांच्या निवडणुका जाहीर

जिल्हानिहाय निवडणुका

ठाणे: कल्याण- ७, अंबरनाथ- १, ठाणे- ५, भिवंडी- ३१, मुरबाड- ३५, व शहापूर- ७९. पालघर: डहाणू- ६२, विक्रमगड- ३६, जवाहार- ४७, वसई- ११, मोखाडा- २२, पालघर- ८३, तलासरी- ११ व वाडा- ७०.

रायगड : अलिबाग- ३, कर्जत- २, खालापूर- ४, पनवेल- १, पेण- १, पोलादपूर- ४, महाड- १, माणगाव- ३ व श्रीवर्धन- १.

रत्नागिरी : मंडणगड- २, दापोली- ४, खेड- ७, चिपळूण- १, गुहागर- ५, संगमेश्वर- ३, रत्नागिरी- ४, लांजा- १५ व राजापूर- १०.

सिंधुदुर्ग : दोडामार्ग- २ व देवगड- २.

नाशिक : इगतपुरी- ५, सुरगाणा- ६१, त्र्यंबकेश्वर- ५७ व पेठ- ७१.

नंदुरबार: अक्कलकुवा- ४५, अक्राणी- २५, तळोदा- ५५ व नवापूर- ८१.

पुणे: मुळशी- १ व मावळ- १.

सातारा : जावळी- ५, पाटण-५ व महाबळेश्वर- ६.

कोल्हापूर: भुदरगड, राधानगरी, आजरा व चंदगड प्रत्येकी एक

अमरावती: चिखलदरा- १.वाशीम: वाशीम- १.

नागपूर: रामटेक-३, भिवापूर-६ व कुही- ८.

वर्धा: वर्धा- २ व आर्वी- ७.

चंद्रपूर: भद्रवाती- २, चिमूर- ४, मूल- ३, जिवती- २९, कोरपणा- २५, राजुरा- ३० व ब्रह्मपुरी- १. भंडारा: तुमसर- १, भंडारा- १६, पवणी- २ व साकोली- १.

गोंदिया: देवरी- १, गोरेगाव, गोंदिया, सडक अर्जुनी प्रत्येकी १ व अर्जुनी मोर- २.

गडचिरोली: चामोर्शी, आहेरी प्रत्येकी २, धानोरा- ६, भामरागड- ४, देसाईगंज,आरमोरी, एटापल्ली प्रत्येकी २, गडचिरोली- १.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com