Co-operative Society Election : राज्यातील १२०८ सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित

ग्रामपंचायत निवडणुका आणि सहकारी संस्थांच्या निवडणुका एकत्र येत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी राज्यातील १२०८ सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Elections of Co-operative Societies
Elections of Co-operative SocietiesAgrowon

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुका (Gram Panchayat Elections) आणि सहकारी संस्थांच्या निवडणुका (Cooperative Elections) एकत्र येत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी राज्यातील १२०८ सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामध्ये ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील सहकारी संस्थांचा समावेश आहे.

Elections of Co-operative Societies
Ethanol Market : इथेनॉलमुळे यंदा ऊस उत्पादकांना वाढीव फायदा | ॲग्रोवन

१८ नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत राज्यातील सात हजार ७५१ सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यामध्ये अ वर्गातील ३८, ब वर्गातील ११७९, क वर्गातील ३१५१ आणि ड वर्गातील २७८८ सहकारी संस्थांचा समावेश होता. मात्र, राज्यातील सात हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही या कालावधीत होत असल्याने गावागावांत तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

तसेच निवडणुका जाहीर झालेल्या अ आणि ब वर्गातील संस्थांच्या सदस्यांची संख्याही मोठी आहे. या संस्थांचे कार्यक्षेत्र एकापेक्षा जास्त तालुक्यांशी संबंधित असल्याने मतदानावेळी सदस्यांना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता होती.

२० डिसेंबरपर्यंत स्थगित

राज्यातील क वर्गातील ३१५१, ड वर्गातील २७८८ संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले होते. त्यामुळे या निवडणुका स्थगित करण्यात आलेल्या नाहीत. मात्र, अ आणि ब वर्गातील निवडणुकांबाबत न्यायालयाचे आदेश नसल्याने या निवडणुका २० डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com