Grampanchayat Election : अमरावती जिल्ह्यातील २५७ ग्रामपंचायतींचा बिगूल वाजला

अमरावती : जिल्ह्यात जानेवारी २०२१ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या २५७ ग्रामपंचायतींच्या महासंग्रामाला सुरुवात होणार आहे.
Grampanchayat Election
Grampanchayat ElectionAgrowon

अमरावती : जिल्ह्यात जानेवारी २०२१ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या २५७ ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayat Election) महासंग्रामाला सुरुवात होणार आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून १८ डिसेंबरला मतदान, तर २० रोजी मतमोजणी केली जाणार आहे. निवडणुकीचा मुहूर्त मिळाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापणार आहे.

Grampanchayat Election
Gram Panchayat Election : दापोलीतील ३० ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

विशेष म्हणजे थेट सरपंचपदाची निवडणूक होणार असल्याने या निवडणुकांना वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारीला सुरुवात केली असून राजकीय हवा तापली आहे. १८ नोव्हेंबरला तहसीलदारस्तरावर नोटीस प्रसिद्ध केली जाईल.

Grampanchayat Election
Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यात ४७५ ग्रामपंचायतींत निवडणूक

तर, २८ नोव्हेंबरपासून नामांकनाला सुरुवात होणार आहे. २१ ऑक्टोबरला प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी जाहीर झाल्यानंतर निवडणुकीच्या तारखांची सर्वांना उत्सुकता लागली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला. थेट सरपंचपदाची निवडणूक होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.

असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम

१८ नोव्हेंबर : तहसीलदार स्तरावर निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करणे.

२८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर : नामनिर्देशनपत्रे सादर करणे

५ डिसेंबर : नामांकनाची छाननी

७ डिसेंबर : नामांकन मागे घेण्याचा अंतिम दिनांक. त्याचदिवशी दुपारी तीन नंतर निवडणूक चिन्हाचे वाटप व अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाईल.

१८ डिसेंबर : सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान

२० डिसेंबर : मतमोजणी करून अंतिम निकाल जाहीर करणे.

२३ डिसेंबर : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करणे.

तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या

अचलपूर २३

अमरावती १२

अंजनगाव १३

भातकुली ११

चांदूरबाजार २४

चांदूररेल्वे १७

चिखलदरा २६

दर्यापूर २५

धामणगाव ०७

धारणी २३

मोर्शी २४

नांदगाव.खं १७

तिवसा १२

वरूड २३

एकूण २५७

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com