Yavtmal Election : सहकारात निवडणुकीची धामधूम

३१ मार्च २०२२नंतर निवडणुकीस पात्र प्राथमिक कृषी पतसंस्था व बहुद्देशीय सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया थांबली होती.
Yavtmal Election News
Yavtmal Election NewsAgrowon

Yavtmal Election News : बाजार समित्यांच्या निवडणुकीपूर्वी (APMC Election) पात्र प्राथमिक कृषी पतसंस्था व बहुद्देशीय सहकारी संस्थांच्या निवडणुका (Elections of Co-operative Societies) घेण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार मुदत संपूनही निवडणुका (Election) न झालेल्या जिल्ह्यातील ५० सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला आहे. त्यानुसार १८ मार्चला या संस्थांसाठी मतदान होणार आहे.

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया आटोपली आहे. त्यानंतर आता सहकार क्षेत्रात निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे.

३१ मार्च २०२२नंतर निवडणुकीस पात्र प्राथमिक कृषी पतसंस्था व बहुद्देशीय सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया थांबली होती.

आता बाजार समिती निवडणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यापूर्वी निवडणुकीस पात्र असलेल्या कृषी पतसंस्था व बहुद्देशीय सहकारी संस्थांच्या निवडणुका घेणे आवश्यक आहे.

त्यानुसार सहकार विभागात पुन्हा एकदा निवडणुकीची लगीनघाई सुरू झाली आहे. जिल्ह्यात ब तसेच ‘क’ वर्गातील जवळपास ५० प्राथमिक कृषी पतसंस्था व बहुद्देशीय सहकारी संस्था आहेत.

प्राधिकरणाच्या आदेशान्वये या ठिकाणी नव्याने कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या सहकारी संस्थांकरिता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.

या संस्थेकरिता १८ मार्चला प्रत्यक्ष मतदान होणार असून, त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. ११ जानेवारीला प्रारूप मतदार यादी करण्यात आली आहे.

Yavtmal Election News
Apmc Election : बाजार समिती निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यात मोर्चेबांधणी

यावर २३ जानेवारीपर्यंत आक्षेप मागविण्यात आले. २३ जानेवारी ते एक फेब्रुवारीदरम्यान प्राप्त आक्षेपांवर निर्णय घेतला जाणार आहे. तीन फेब्रुवारीला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे. यासाठी सहकार विभाग कामाला लागला आहे.

निवडणूक कार्यक्रम

नामनिर्देशन पत्र विक्री व स्वीकृती-१३ ते १७ फेब्रुवारी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com