Co-operative Societies Election : राज्यात एक मार्चपासून सहकारी संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आदेश
Elections
Elections Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे : कोरोना प्रादुर्भाव आणि अन्य नैसर्गिक आपत्तींमुळे प्रलंबित राहिलेल्या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा (Co-operative Societies Election) बिगुल वाजला आहे.

ही प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत.

त्यामुळे १ एप्रिल २०२१ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत निवडणुकीस पात्र असलेल्या अ, ब, क आणि ड वर्गातील एकूण २० हजार ६३८ सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया १ मार्चपासून सुरू होणार असल्याची माहिती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी दिली.

निवडणूक होऊ घातलेल्या संस्थांमध्ये प्रामुख्याने राज्यातील २८ सहकारी साखर कारखाने, ३ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि २६ सहकारी सूतगिरण्यांचा समावेश आहे. राज्यात मार्च २०२० मध्ये कोरोनाची साथ आली. ही साथ नियंत्रणात येत असताना राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर अनुदानाची योजना राबवायला सुरुवात केली.

Elections
co-operative milk unions : सहकारी दूध संघांतील भ्रष्टाचाराची चौकशी करा

त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका सातत्याने पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने १५ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या आदेशानुसार १ एप्रिल २०२१ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीतील निवडणुकीस पात्र सर्व प्रकारच्या सहकारी संस्था (कृषी पतसंस्था आणि बहुउद्देशी सहकारी संस्था वगळता) यांच्या निवडणूक प्रक्रिया १ मार्च २०२३ पासून सुरू करण्याबाबत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.

या संस्थांच्या निवडणुकांसाठी १ फेब्रुवारी २०२३ या अर्हता दिनांकावर प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे प्राधिकरणाने सन २०२३ मधील १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीतील निवडणुकीस पात्र अ, ब, क व ड वर्गातील निवडणूक अनुक्रमे १५०, १२०.६० आणि ६० दिवस जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांना आदेश देण्यात आलेले आहेत.

या संस्थांच्या निवडणुकांसाठी संचालक सहकारी संस्थांच्या प्रक्रिया संचालक मंडळाची मुदत संपण्यापूर्वी अगोदर सुरू करण्याबाबत मंडळाची मुदत संपल्याच्या दिनांकावर प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात येणार आहेत.


२० हजार ६३८ संस्थांच्या होणार निवडणुका
ज्या सहकारी संस्था निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी सादर करणार नाहीत किंवा पुरेसा निवडणूक निधी उपलब्ध करणार नाहीत अशा संस्थांवर कायद्यांतर्गत कारवाई करण्याबाबतचे आदेश देखील जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत.

या आदेशानुसार अ, ब, क व ड वर्गातील अनुक्रमे ६३, १ हजार १४, १० हजार १६३ आणि ९ हजार ३९८ अशा एकूण २० हजार ६३८ सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्या आहेत, असे खंडागळे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com