Agricultural Electricity
Agricultural ElectricityAgrowon

Agriculture Electricity : शेतीला दिवसा चार तासच वीजपुरवठा

शेतकऱ्यांना आठवड्यातील तीन दिवस दिवसा, आठ तास रडतखडत वीज देणाऱ्या महावितरण कंपनीने त्यात आणखी चार तासांची कपात करून जोरदार झटका दिला आहे.

आटपाडी, जि. सांगली ः शेतकऱ्यांना आठवड्यातील तीन दिवस दिवसा, आठ तास रडतखडत वीज (Agriculture Electricity) देणाऱ्या महावितरण (Mahavitaran) कंपनीने त्यात आणखी चार तासांची कपात करून जोरदार झटका दिला आहे. दिवसा मिळणाऱ्या विजेत कपात (Power Reduction) केल्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Agricultural Electricity
Agriculture Electricity : बुलडाणा जिल्ह्यात कृषिपंपांची सक्तीची वीजतोडणी थांबवा

आटपाडी तालुक्यात रब्बी हंगामात प्रामुख्याने ज्वारी, गहू, हरभरा आणि मका ही पिके मोठ्या प्रमाणावर घेतली आहेत. सध्या ज्वारी, मका आणि गहू पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची सगळीकडे लगबग चालली आहे. रब्बी पिकांना पाण्याची गरज वाढत चालली असतानाच महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना दिवसा मिळणाऱ्या विजेत आणखी चार तास कपात करून झटका दिला आहे.

Agricultural Electricity
Agriculture Electricity : विदर्भातील पाच जिल्ह्यांतील कृषिपंपांना दिवसा वीज

आठवड्यातील शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस दिवसा आठ तास शेतीसाठी वीजपुरवठा केला जात होता. सकाळी आठ ते दुपारी चार ही वीजपुरवठ्याची वेळ आहे, तर मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी रात्री साडेनऊ ते पहाटे साडेपाचपर्यंत वीजपुरवठा केला जातो.

मात्र या आठवड्यापासून महावितरण कंपनीने कोणतीही पूर्वसूचना आणि कारण न देता शेतकऱ्यांना दिवसा दिल्या जाणाऱ्या विजेत अचानक चार तासांची कपात सुरू केली आहे.

आधीच शेतीसाठी आठ तास वीज कशीतरी रडतखडत मिळत होती. आठ तासांत पंधरा वेळा वीज खंडित होत होती. त्यातच महावितरण कंपनीने चार तासांवर वीजपुरवठा आणला आहे. तोही वारंवार खंडित होतो आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड संतापला आहे. पिकांना दिवसा पाणी देणे शक्यच राहिलेले नाही. तीन दिवस रात्री वीजपुरवठा होतो. या काळातच पिकांना रात्रीचे पाणी देण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर दुसरा कोणताही पर्याय राहिलेला नाही.

सर्पदंशाचे वाढते प्रमाण

‘टेंभू’ योजनेचे पाणी तालुक्यात आले आहे. या पाण्यातून मोठ्या प्रमाणावर विविध जातीचे सर्प आले आहेत. पूर्वी फार क्वचितच सर्पदंशाच्या घटना घडत होत्या. अलीकडे दोन वर्षांत तालुक्यात सर्पदंशाचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. कधीही दृष्टीस न पडणारे सर्प अलीकडे सहज कुठेही आढळू लागलेत. त्यात ‘महावितरण’ने शेतीचा चार तासांनी वीजपुरवठा कमी केल्यामुळे पिकांना रात्री पाणी पाजण्याशिवाय शेतकऱ्यांपुढे अन्य कोणताही पर्याय राहिला नाही. रात्री अंधारात धोका पत्करून पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे सर्पदंशाच्या घटनांमध्ये आणखी भर पडत चालली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com