Electricity : थकबाकीमुळे वीजपुरवठा होणार खंडित

महावितरणला वीजबिलाच्या प्रचंड थकबाकीमुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वीज ग्राहक वापरलेल्या वीज बिलाचा भरणा न केल्यामुळे थकबाकीचा डोंगर दिवसेंदिवस वाढत आहे.
Electricity
Electricity Agrowon

औरंगाबाद : महावितरण (MSEDCL) शहर मंडळ अंतर्गत छावणी, पावर हाऊस, हर्सूल, शहागंज, सिडको, चिकलठाणा, गारखेडा, क्रांती चौक या उपविभागामधील घरगुती ग्राहकांनी अनेक महिन्यांपासून वीज देयकाची (Electricity Bill) भरणा न केल्याने मोठ्या प्रमाणात थकबाकीचा (Electricity Bill Arrears ) डोंगर साचला आहे. त्यामुळे २० ते २५ ऑगस्ट २०२२ या काळात थकीत बिल असणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा (Electricity Supply) खंडित करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.

महावितरणला वीजबिलाच्या प्रचंड थकबाकीमुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वीज ग्राहक वापरलेल्या वीज बिलाचा भरणा न केल्यामुळे थकबाकीचा डोंगर दिवसेंदिवस वाढत आहे. वीज ग्राहकांनी बिलाचा भरणा करावा यासाठी महावितरणकडून एसएमएस द्वारे सूचना देणे, भेटीद्वारे बिल भरण्याचे आवाहन करणे, पत्रव्यवहार करणे, देय दिनांकापूर्वी वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांसाठी बक्षीस योजना राबवणे आदी द्वारे ग्राहकांना संपर्क करून जनजागृती करण्यात येत आहे.

Electricity
Electricity : वीजचोरीची अडीच हजांरावर प्रकरणे उघडकीस

तसेच बिल तयार झाल्याच्या सात दिवसांत बिल भरल्यास जवळपास एक टक्के तत्पर देयक भरणा सूट मिळते. तसेच ऑनलाइन बिल भरल्यास ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्का सूट महावितरणतर्फे देण्यात येत आहे. तरीही काही घरगुती ग्राहक दरमहा वीजबिल भरण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे महावितरणला वीजबिल वसुलीसाठी कडक धोरण अवलंबून २० ते २५ ऑगस्ट या कालावधीत ग्राहकांकडे थकबाकी भरून घेणे, अथवा त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या सक्त सूचना संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांनी चालू वीजबिलासह थकबाकीचा भरणा करण्याचे आवाहन महावितरण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांनी केले आहे.

ग्राहक आणि थकबाकी पुढीलप्रमाणे

उपविभाग ग्राहक थकबाकी (लाख रु.)

छावणी ३०,५१७ २१४४. ५९

शहागंज २८,२८८ १९५७. ५४

पावर हाउस ७,५७३ २६१. १९

चिकलठाणा २२,९०९ ६२५. ५१

गारखेडा १६,०२२ ४३६. ९०

क्रांतिचौक ९,२७४ ३८६. ८३

सिडको ६,६०० ९९. ७८

औरंगाबाद शहर १,२१,१८३ ५९१२. ३४

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com