Electricity : महिलांच्या आंदोलनानंतर वीज रोहित्र बुधवारपर्यंत बसवणार

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर महिला शक्ती रस्त्यावर उतरल्यानंतर महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना रोहित्र बसवून देण्याचे आश्‍वासन द्यावे लागले. जिल्ह्यात या आंदोलनाची एकच चर्चा सध्या होत आहे.
womens Movement
womens Movement Agrowon

अडगाव, जि. अकोला ः शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर महिला (Women's Protest ) शक्ती रस्त्यावर उतरल्यानंतर महावितरण (Mahavitaran) कंपनीच्या अधिकाऱ्यांना रोहित्र (Electric Transformer) बसवून देण्याचे आश्‍वासन द्यावे लागले. जिल्ह्यात या आंदोलनाची एकच चर्चा सध्या होत आहे.

womens Movement
Onion Rate : कांदा उत्पादकांचा पुन्हा भ्रमनिरास | ॲग्रोवन

अडगाव बुद्रूक शेतशिवारातील वीज रोहित्र बंद असल्याने शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी आश्‍वासन देऊनही वीज कंपनीकडून वीज रोहित्र बसवून देण्याचा शब्द पाळल्या गेला नाही. अखेरीस या प्रश्‍नावर महिलांनी पुढाकार घेत दोन दिवसांपूर्वी येथील अकोट- हिवरखेड मार्गावर अर्धातास रास्तारोको आंदोलन केले.

शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे यांनी मध्यस्थी केल्यानंतर बुधवार (ता.१६) पर्यंत रोहित्रे बसतील असे आश्वासन वीज कंपनीच्या अधिकाऱ्याने दिले. त्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले होते.

womens Movement
Sugar Export: महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांसाठी गोड बातमी

तत्पूर्वी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अडगाव बुद्रुक उपकेंद्रात काही रोहित्रे बसविण्यासाठी आणली होती. परंतु अधिकाऱ्यांनी दिलेला शब्द फिरवत वीजबिल भरल्याशिवाय रोहित्रे बसवणार नसल्याची भूमिका घेतली. हा शेतकऱ्यांचा अपमान असल्याची बाब मांडत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकार यांच्या मार्गदर्शनात महिला आघाडी प्रमुख प्रमिला भारसाकळे यांच्या नेतृत्वात महिला रस्त्यावर उतरल्या.

यात किरण कौठकार, आशा नेमाडे, मंजूषा गिऱ्हे, मुक्ता राहटे, नंदा मसुरकर, आशा ढोकणे, शीला ढोकणे, सिंधूताई देऊळकार, रंजना बागडे, वर्षा नेमाडे, सुचिता देऊळकार, गोदावरी इंगळे यांच्यासह इतर महिलांनी सक्रिय सहभाग घेतला. सध्या या आंदोलनाची एकच चर्चा होत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com