Ravikant Tupkar : ‘एल्गार मोर्चा’ हा शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याची लढाई

जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात तुपकर यांचे गावोगावी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. तुपकर एल्गार मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर फिरत आहेत.
Ravikant Tupkar
Ravikant TupkarAgrowon

संग्रामपूर, जि. बुलडाणा : एल्गार मोर्चा (Elgar Morcha) म्हणजे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना (Soybean Cotton Farmer) एकत्र येण्याची योग्य वेळ आहे. ६ नोव्हेंबरला बुलडाण्यात होणारा ‘एल्गार मोर्चा’ हा शेतकऱ्यांच्या हक्काचा लढा असून, या मोर्चाच्या निमित्ताने बुलडाण्यातून शेतकऱ्यांच्या स्वातत्र्याच्या लढाईचा बिगुल फुंकल्या जाणाऱ्या आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने या लढ्यात सहभागी व्हा, असे आवाहन रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी केले आहे.

Ravikant Tupkar
Crop Damage Survey : नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे तत्काळ करा

जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात तुपकर यांचे गावोगावी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. तुपकर एल्गार मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर फिरत आहेत. २८ ऑक्टोबर रोजी त्यांनी जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यात शेतकरी पुत्र व युवा कार्यकर्त्यांनी तसेच शेतकरी, शेतमजुरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

वरवट बकाल आणि जळगाव जामोद येथील बैठकीला शेतकरी, शेतमजूर व युवा आंदोलक अक्षय पाटील यांच्या नेतृत्वात शेतकरीपुत्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर जळगाव जामोद तालुक्यातील गाडेगाव बुद्रूक आणि संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा बुद्रुक या गावांमध्ये झालेल्या सभा लक्षवेधी ठरल्या.

Ravikant Tupkar
Crop Advisory : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा कृषी सल्ला

या दोन्ही सभांना शेतकरी, शेतमजूर आणि युवकांची प्रचंड उपस्थिती होती. सोयाबीन - कापसाचा भाव, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई, शेतमजुरांना संरक्षण, महिला बचत गटांची कर्जमाफी यासह शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्यांसाठी पक्षाचे झेंडे बाजूला ठेऊ आणि शेतकरी म्हणून एकत्र येऊ, असा नारा तुपकर यांनी दिला.

दुचाकी रॅलीने स्वागत

तुपकर यांचे जळगाव जामोदमध्ये आगमन होताच अक्षय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो युवकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. जळगाव जामोद ते गाडेगाव बुद्रुक अशी २० किलोमीटरची दुचाकी रॅली काढली. बुलडाणा येथे होणाऱ्या ‘एल्गार मोर्चा’ला सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे. दरम्यान संग्रामपूर तालुक्याच्या दौऱ्यात अडत व्यापारी संघटना, हमाल संघटना आणि संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक मंडळाने देखील ‘एल्गार मोर्चा’ला पाठिंबा जाहीर करत शेतकरी म्हणून या लढ्यात सहभागी होणार असल्याचे आश्वासन दिले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com