Farmer Incentive Scheme : जिल्ह्यातील पात्र शेतकरी वंचित ठेवणार नाही : जयवंशी

जे शेतकरी नियमित पीककर्ज भरत आहेत अशा शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नाही. त्यांनी तालुक्याच्या तहसील कार्यालयाशी संपर्क साधून आधार प्रमाणीकरण करून घ्यावे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

सातारा : जे शेतकरी नियमित पीककर्ज (Crop Loan) भरत आहेत अशा शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण (Aadhar Verification) झाले नाही. त्यांनी तालुक्याच्या तहसील कार्यालयाशी संपर्क साधून आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. प्रोत्साहनपर योजनेपासून (Farmer Incentive Scheme) एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. पहिली यादी प्रसिद्ध झाली असून, ज्या पात्र शेतकऱ्यांची नावे नाहीत. त्यांनी काळजी करू नये. त्यांचीही यादी लवकरच प्रसिद्ध होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी (Ruchesh Surywanshi) यांनी दिली.

महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ वितरण प्रारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मंत्रालयात झाला. या वेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह मंत्री, सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुप कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्यासह सहकार विभागातील अधिकारी उपस्थित होते.

Crop Insurance
Crop Insurance : विमा कंपन्यांबाबत कठोर निर्णय घेण्याची वेळ

सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथून दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते. या वेळी प्राथमिक स्वरूपात शेतकऱ्यांचा सत्कार जिल्हाधिकारी जयवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.

जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले, ‘प्रोत्साहनपर योजनेपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे. पहिली यादी प्रसिद्ध झाली असून, ज्या पात्र शेतकऱ्यांची नावे नाहीत. त्यांनी काळजी करू नये. त्यांचीही यादी लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.

महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तीन लाख ६९ हजार १४० शेतकऱ्यांची कर्ज खाती अपलोड करण्यात आली आहेत. आजअखेर ८४ हजार १०८ शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ८२ हजार ४३५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण केले आहे. आतापर्यंत ९८.६० टक्के काम पूर्ण झाले असून, शेतकऱ्यांच्या खात्यावर अंदाजित २९०.२३ कोटी रक्कम जमा होणार आहे.’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com