
वर्धा : जिल्ह्यातील एक जिल्हा एक उत्पादनाअंतर्गत वायगाव हळद व कापूस निर्यात (Cotton Exports) वाढविण्यासाठी सर्वतोपरी साह्य केले जाईल. जिल्हा उद्योग केंद्र व इतर संबंधित विभागामार्फत निर्यातदारांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
विकास भवन येथे निर्यात, एक जिल्हा एक उत्पादन व व्यवसाय सुलभीकरण या विषयावर आयोजित एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. या वेळी उद्योग सहसंचालक गजेंद्र भारती, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक सुप्रिया बावनकुळे, एमगिरीचे संचालक यादव, एमआयडीसी वर्धा असोसिएशनचे प्रवीण हिवरे.
लघुउद्योग भारतीचे शशिभूषण वैद्य, उद्योग उपसंचालक सुशील गरुड, उद्योग आधिकारी कमलेशकुमार जैन, खादी ग्रामोद्योगचे श्री. चेचेरे, नाबार्डचे सुशांत पाटील, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक वैभव लहाणे, आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर, एनएचएआयचे प्रकल्प संचालक ब्राह्मणकर, सहायक आयुक्त राज्यकर श्री. बोरकर, मिटकॉनचे कोरडे व एमसीईडीचे तायवाडे उपस्थित होते. महाराष्ट्राच्या एकूण निर्यातीत वर्धा जिल्ह्याचा सद्यःस्थितित असलेला ०.२३ टक्के वाटा भविष्यात वाढविण्याकरिता उद्योग विभाग प्रयत्नशील असेल, असे उद्योग सहसंचालक गजेंद्र भारती यांनी सांगितले.
जिल्ह्यातील उद्योजक, नवउद्योजक, शेतकरी इत्यादींनी निर्यात क्षेत्रात सहभागी होऊन जिल्ह्याला निर्यात क्षेत्रात अग्रस्थानी न्यावे तसेच बळकटी प्रदान करावी याकरिता ही कार्यशाळा उद्योग विभाग व सिडबी तर्फे आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेला दोनशेहून अधिक उद्योजक व संभाव्य निर्यातदार उपस्थित होते.
उपस्थितांना ई अँड वायच्या प्रणाली पखाले, ग्लोबल फॉर्च्यूनच्या के. डी. सुषमा, अपेडाच्या प्रणिता चौरे, स्पाइसेस बोर्ड ऑफ इंडियाच्या ममता रुपोलिया, सिडबीचे आशिष मुनघाटे, सीए वरूण विजयवर्गी, पी. वी. टेक्सटाइलचे शहाणे, सीए भागवत ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती भगत यांनी केले. कार्यक्रमाची सांगता श्री. बावणकुळे यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.