Nira River : सराटी येथे ढापे टाकल्याने बंधारा तुडुंब

ओझरे येथील बंधाऱ्याच्या एका पिलरवरील स्लॅबचे काम केले असून, उजव्या कडेचा भरावही भरण्यात आला आहे. लुमेवाडी येथील दोन्ही बाजूच्या भरावाचे व एका ढासळलेल्या पिलरचे काम करून पाणी अडविले आहे. त्यामुळे नागरिकांची सोय झाली आहे.
Water News
Water NewsAgrowon

नीरा नरसिंहपूर, ता. इंदापूर : तालुक्यातील सराटी येथील नीरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे (Kolhapuri Bandhara) ढापे टाकून पाणी अडवल्याने तुडुंब भरला आहे.

ओझरे येथील बंधाऱ्याच्या एका पिलरवरील स्लॅबचे काम केले असून, उजव्या कडेचा भरावही भरण्यात आला आहे.

लुमेवाडी येथील दोन्ही बाजूच्या भरावाचे व एका ढासळलेल्या पिलरचे काम करून पाणी अडविले आहे. त्यामुळे नागरिकांची सोय झाली आहे.

नरसिंहपूर येथील बंधारा नव्याने बांधण्यात आला असून, गिरवी येथील बंधाऱ्याची एका बाजूचा भराव पुन्हा पाण्याच्या रेट्यामुळे वाहून गेला आहे. नरसिंहपूरपर्यंतचे बंधारे पुन्हा नादुरुस्तीमुळे या वर्षीही हळूहळू रिकामे होण्याची भीती आहे.

त्यामुळे इंदापूर व माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांवर ऐन उन्हाळ्यात दुष्काळाचा सामना करण्याची वेळ येणार आहे. नीरा नदीवरील सराटी, भगतवाडी, निरनिमगाव आदींसह बंधाऱ्यांची ढापे टाकून पाणी अडविण्यात आले आहेत.

तर लुमेवाडी, ओझरे, गिरवी बंधाऱ्यांचे भराव पुन्हा पुराच्या पाण्याने वाहून गेल्यामुळे शेवटच्या टप्प्यात कसेबसे पाणी अडवण्यात आले आहे. त्यामुळे मागील दोन वर्षा प्रमाणे याहीवर्षी शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे.

Water News
Water Conservation : टाकरवणच्या गावतलावांना हवी ‘पुनरुज्जीवनाची’ सकारात्मकता

दरम्यान, आमदार दत्तात्रेय भरणे यांनी सदर बंधाऱ्यांसाठी निधी मंजूर करून आणून काम करण्यास दिले होते. परंतु जलसंपदा विभागाच्या अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने कामात हलगर्जीपणामुळे निकृष्ट दर्जाचे कामामुळे मोठे नुकसान झाले आहे.

त्यामुळे याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com