National Animal Park : बोरिवली राष्ट्रीय उद्यानातील व्याघ्र-सिंह सफारीला खीळ

दोन्ही सफारी गेल्या पाच वर्षांपासून बंद आहेत. सफारी परिसरात सुरू असलेले पुनर्विकासाचे काम बांधकाम विभागाकडून (पीडब्ल्यूडी) धीम्या गतीने सुरू आहे.
National Animal Park
National Animal ParkAgrowon

मिलिंद तांबे

मुंबई : बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (Sanjay Gandhi National Park) म्हणजेच नॅशनल पार्कमधील टायगर (Tiger) आणि लायन (Lion) सफारी पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. मात्र, दोन्ही सफारी गेल्या पाच वर्षांपासून बंद आहेत.

सफारी परिसरात सुरू असलेले पुनर्विकासाचे काम बांधकाम विभागाकडून (पीडब्ल्यूडी) धीम्या गतीने सुरू आहे. परिणामी त्याचा फटका सफारीला बसला असल्याचे उद्यान सह संचालक (दक्षिण विभाग) रेवती कुलकर्णी यांनी सांगितले.

व्याघ्र आणि सिंह सफारीसाठी नॅशनल पार्कात नेहमीच पर्यटकांची गर्दी होत होती. सध्या मात्र ती रोडावल्याचे दिसते. व्याघ्र आणि सिंह सफारीवर आलेल्या मर्यादा हेही त्यामागील महत्त्वाचे कारण आहे.

नॅशनल पार्कातील सफारी परिसराचे होत असलेले नूतनीकरण हे मुख्य कारण आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून बांधकाम सुरू आहे.

मात्र त्याची गती वाढवण्याची गरज आहे. काम पूर्ण न झाल्याने व्याघ्र सफारी २०१७ पासून आणि सिंह सफारी २०१८ पासून प्रभावित झाली आहे.

नॅशनल पार्कातील १२ हेक्टर परिसराचा वापर सफारीसाठी केला जातो. त्यात आता वाढ करून ते क्षेत्र प्रत्येकी २० हेक्टरपर्यंत वाढवण्यात येत आहे.

इतक्या मोठ्या परिसरामध्ये विनाअडथळा फिरणारे प्राणी पर्यटकांना सफारीच्या सुरक्षित बंदिस्त वाहनांमधून पाहता येत होते. त्यामुळे ताडोबाच्या धर्तीवर मुंबईतही पर्यटकांना सफारीचा आनंद घेता येत होता.

कंत्राटदाराला दंड ठोठावण्याची गरज

काम सुरू असल्यामुळे सफारीतील दोन सिंह आणि चार वाघांना पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहे. शिवाय गेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे आतील अडीच किलोमीटर धावणाऱ्या रेल्वेसेवेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यावरही सुमारे ३० कोटींचा खर्च करावा लागणार आहे.

त्याचे अंदाज पत्रक तयार करण्यात आले असून मंजुरीसाठी शासन स्तरावर पत्रव्यवहार सुरू आहे.

सध्या सफारीमध्ये पिंजऱ्यातील प्राणी दिसत असले तरी त्यांना पाहायला पर्यटक फारसे इच्छुक नाहीत. त्याचा फटका उद्यान प्रशासनाला बसला असून महसूलही कमी झाला आहे.

बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा त्याला जबाबदार असल्याचे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कंत्राटदाराला दंड ठोठावणे गरजेचे असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले.

National Animal Park
Melghat Tiger Project : व्याघ्र संरक्षणाबाबत निकषपूर्ती

दरम्यान, याबाबत ‘पीडब्ल्यूडी’चे अभियंते अमित वाघमारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

National Animal Park
National Food Security : राष्ट्रीय अन्नसुरक्षेतील लाभार्थ्यांना मिळणार मोफत धान्य

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com