Soybean Seed : सोयाबीनच्या ‘हब’मध्ये घरचे बियाणे वापरावर जोर

Home Grown Soybean Seed : मध्य प्रदेश तसेच इतर राज्यांतील बियाणे कंपन्या या ठिकाणी थेट बाजारपेठांमधून हे सोयाबीन खरेदी करीत असतात.
Soybean Seeds
Soybean SeedsAgrowon

Washim News : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा घरचे सोयाबीन बियाणे वापरावर अधिक जोर तयार झाल्याने कोट्यवधींच्या उलाढालीला ब्रेक लागला आहे. कंपन्यांना मिळणारा पैसा वाचला. सोबतच निकृष्ट दर्जाच्या बियाण्याबाबत असलेल्या तक्रारींची संख्याही प्रचंड कमी सुद्धा झाली. एक सकारात्मक चित्र या जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

वाशीम जिल्हा हा दर्जेदार सोयाबीन विक्रीचा हब मानल्या जातो. मध्य प्रदेश तसेच इतर राज्यांतील बियाणे कंपन्या या ठिकाणी थेट बाजारपेठांमधून हे सोयाबीन खरेदी करीत असतात.

या जिल्ह्यात चार वर्षांपूर्वी सोयाबीन लागवड करणारे शेतकरी हे सरसकट बाजारपेठेतून कंपन्यांनी विक्रीला आणलेले बियाणे खरेदी करीत होते. जिल्ह्याचे खरिपात सोयाबीन लागवडीचे क्षेत्र हे आता तीन लाख हेक्टरपर्यंत पोचले आहे.

Soybean Seeds
Soybean Market: सोयाबीन बाजार मे महिन्यातही दबावात का आला?

खरिपात एकूण पिकांच्या तुलनेत सोयाबीन हे प्रमुख पीक आहे. २०१९-२० च्या हंगामात सुमारे ८७ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची उलाढाल होती. यावरून बियाणे बदलाचे प्रमाण किती होते हे स्पष्ट होते.

कोट्यवधी रुपये बियाणे कंपन्यांना मिळत होते. कृषी खात्याने गेल्या तीन-चार वर्षांत खरीप हंगामाच्या अनुषंगाने सातत्याने जनजागृती करीत घरचे बियाणे तयार करण्याबाबत गावोगाव प्रशिक्षणे दिली.

Soybean Seeds
Soybean Variety : सोयाबीन लागवडीसाठी योग्य जातींची निवड

याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. शेतकरी स्वतःला लागणारे बियाणे स्वतःच तयार करून साठवतो. तर अनेक शेतकरी हे इतरांनाही सोयाबीनचे बियाणे विक्री करून दोन पैसे अधिक कमावत आहेत. हे प्रमाण सातत्याने वाढत चालले.

बियाणे लागवडीपूर्वी उगवण क्षमता तपासणी, लागवडीआधी जैविक व रासायनिक बीज प्रक्रिया, पेरणीचे योग्य अंतर, बीबीएएफ, टोकण पद्धतीने लागवडीवर जोर, अशा बारीकसारीक गोष्टींनाही प्राधान्य देण्यात येत आहे. मागील काही वर्षांत बियाण्यांबाबतच्या तक्रारींचा ओघही सातत्याने कमी होत आहे.

वर्षनिहाय सोयाबीन बियाणे मागणी

वर्ष---मागणी

२०१९-२०---८७०२२

२०२०-२१---८०९००

२०२१-२२---६३००६

२०२२-२३---५४०००

२०२३-२४---४००००

गेल्या हंगामात सुमारे ४० कोटी रुपयांचे सोयाबीनचे बियाणे कंपन्यांना परत न्यावे लागले. २०१९-२० पासून जिल्ह्यात सातत्याने सोयाबीन बियाण्याची उचल घटत चाललेली आहे. नवीन बियाणे खरेदीचे प्रमाण तब्बल ५२ टक्के झाले होते. पण जनजागृतीमुळे आता शेतकरी अधिकाधिक घरचेच सोयाबीन बियाणे लागवडीसाठी वापरत असल्याने त्याचा उत्पादन खर्च कमी होण्यासही हातभार लागतो आहे. यंदाही घरच्या बियाण्याचाच सर्वाधिक वापर जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत.
- शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशीम

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com