Agriculture Electricity : शेतीला दिवसा वीज देण्यासाठी ‘सोलरायझेशन’ करण्यावर भर

शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. त्यासाठी शेतीचे ‘सोलरायझेश’ करायचे आहे. सध्या शेतीसाठी आठ हजार मेगावॉट वीज देत आहोत.
Agriculture Electricity
Agriculture ElectricityAgrowon

Agriculture Electricity नगर ः शेतकऱ्यांना दिवसा वीज (Day Time Electricity) देण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. त्यासाठी शेतीचे ‘सोलरायझेश’ (Solarization) करायचे आहे. सध्या शेतीसाठी आठ हजार मेगावॉट वीज देत आहोत.

त्यातील पुढील दोन ते तीन वर्षांत किमान चार हजार मेगावॉट वीज ‘सोलर’च्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न असेल. त्यासाठी जमीन उपलब्ध करण्याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महसूल यंत्रणांना सांगण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांनी सांगितले.

एका अर्जावर महसुलमधील सर्व कागदपत्रे देण्यासाठी योजना आखली जात आहे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. लोणी (ता. राहाता) येथे दोन दिवसीय महसूल परिषदेचा श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. २३) समारोप झाला.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह राज्यभरातील महसूल विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी या वेळी उपस्थित होते.

Agriculture Electricity
Electricity Rate : वीज दरवाढीच्या विरोधात ‘आप’ची हरकत

फडणीस म्हणाले, महसुल परिषदेमुळे चांगले महसूल खात्यातील कामाला गती येईल. चांगले ‘रोड मॉडेल’ तयार होईल. महसुल विभागाकडून मिळणारी कागदपत्रे मिळण्यासाठी एकाचा अर्जाचा वापर आणि पारदर्शक पद्धतीने ते लोकांना देता येतील, वाळू संदर्भात चांगल्या प्रकारे पारदर्शक यंत्रणा तयार करता येईल, अकृषी (एनए) करण्यासंदर्भात लोकांना होणारा त्रास कमी कसा करता येईल आदीसाठी सरकार विशेष प्रयत्न करणार आहे.

Agriculture Electricity
Agriculture Subsidy : शेतकऱ्यांना दरवर्षी एकरी १५ हजार रुपये अनुदान द्या

राज्यात लोकांनी मोठा प्रतिसाद दिलेल्या जलयुक्त शिवार अभियान (दोन) या महत्त्वाकांक्षी योजनाही लवकरच सुरुवात करत आहोत. आवास योजनेतून जास्तीत जास्त लोकांना घरे कशी देता येतील या बाबत शासन प्लॅनिंग करत आहे.

दोन दिवसाच्या या परिषदेमुळे महसूल विभागाला अधिक गती येईल आणि त्यातून चांगले काम शेतकरी, नागरिकांसाठी होईल.

सगळ्या भावींना शुभेच्छा

लोणी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले, ‘‘पोट निवडणुकीत सगळेत मत मागतात. मत मागण्यासाठी जाणं यात लाज वाटण्यासारखं काय आहे.

आतापर्यंत झालेल्या पोटनिवडणुकीत मोठे नेते फारसे जात नव्हते, पुण्यात होत असलेल्या पोट निवडणुकीत मात्र शरद पवारसाहेब यांच्यासह सगळे प्रचारात उतरलेत.

त्यामुळे आम्ही जाणं त्यात काय वेगळं आहे. राष्ट्रवादीत भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री म्हणण्याची पद्धत आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना भावी वाटतात, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. उद्धव ठाकरे अथवा आदित्य ठाकरे हे आमचे शत्रू नाहीत. वैचारिक विरोधक आहेत.’’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com