प्राथमिक कृषी पतसंस्थांसाठी पाच वर्षांचे धोरण आणण्यावर भर

नॅशनल फेडरेशन ऑफ स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक्सची स्थापना १९ मे १९६४ रोजी करण्यात आली होती, ज्याचा व्यापक उद्देश राज्य आणि केंद्रीय सहकारी बँकांच्या कामकाजात सुलभता आणण्यासाठी आणि अल्प-मुदतीच्या सहकारी पत संरचनेचा विकास करण्याच्या उद्देशाने झाला होता.
Amit Shah
Amit ShahAgrowon

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सहकार मंत्रालय आणि नॅशनल फेडरेशन ऑफ स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स (एनएएफएससीओबी) तर्फे आयोजित ग्रामीण सहकारी बँकांच्या (Rural Cooperative Bank) एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्‍घाटन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी शुक्रवारी (ता. १२) केले. कार्यक्रमादरम्यान, त्यांनी प्राथमिक कृषी पतसंस्थां (पीएसीएस) साठी सुधारणा आणि धोरण तयार करण्याची भूमिका मांडली. मानवी संसाधनांमध्ये सुधारणा करण्यात मदत करण्यासाठी पीएसीएसच्या संगणकीकरणाची गरज त्यांनी व्यक्त केली.

Amit Shah
Soybean Rate : सोयाबीनला यंदाही चांगला दर मिळणार

जूनमध्ये, आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने प्राथमिक कृषी पतसंस्थांच्या संगणकीकरणास पीएसीएसची कार्यक्षमता वाढवणे, त्यांच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्याच्या उद्देशाने मान्यता दिली; पीएसीएसला त्यांच्या व्यवसायात विविधता आणण्यासाठी आणि अनेक उपक्रम/सेवा सुरू करण्यासाठी सुविधा देण्यात येणार आहेत. या प्रकल्पाच्या ५ वर्षांच्या कालावधीत सुमारे ६३,००० कार्यरत पीएसीएसचे संगणकीकरण प्रस्तावित करण्यात आले असून एकूण बजेट परिव्यय रु. २५१६ कोटी असून, केंद्र सरकारचा हिस्सा रु. १,५२८ कोटी आहे.

नॅशनल फेडरेशन ऑफ स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक्सची स्थापना १९ मे १९६४ रोजी करण्यात आली होती, ज्याचा व्यापक उद्देश राज्य आणि केंद्रीय सहकारी बँकांच्या कामकाजात सुलभता आणण्यासाठी आणि अल्प-मुदतीच्या सहकारी पत संरचनेचा विकास करण्याच्या उद्देशाने झाला होता. देशात ८.५ कोटी सहकारी संस्था असून त्यामध्ये २९ कोटी सदस्य आहेत. ही संख्या १०० कोटींहून अधिक करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

प्राथमिक कृषी पतसंस्थांसाठी ५ वर्षांचे धोरण तयार करण्याची गरज आहे. भारत सरकारने पीएसीएसच्या संगणकीकरणासाठी सहकार मंत्रालयाच्या संस्थेवर एक योजना आणली, जी मानवी संसाधनांमध्ये सुधारणा करण्यात मदत करेल.
अमित शाह, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com