
जालना : दिवसेंदिवस भाऊहिस्से वाढत आहे. त्यामुळे अल्पभूधारक शेतकरी (Small holder Farmer) संख्या वाढत आहे. शेती (Agriculture) एकट्याने करण्याचा विषय राहिला नाही. त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी एकोपा जपत शेतीसाठी एकत्रित येणे गरजेचे असल्याचे मत गटशेती (Group Farming) व फळबाग तज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांनी व्यक्त केले.
ऍग्रोइंडिया गटशेतीचा २१५ वा मासिक कार्यक्रम वालसा खालसा (ता. भोकरदन) येथे नुकताच झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कापसे होते. व्यासपीठावर भराडखेडा (ता. बदनापूर) येथील प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब घुगे, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक संशोधन डॉ. सूर्यकांत पवार, सेवानिवृत्त ज्येष्ठ शास्रज्ञ डॉ. एस. एस. माने, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राचे रामेश्वर ठोंबरे, गटप्रमुख लक्ष्मण सवडे, श्री. दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. कापसे म्हणाले, की शेतकरी एकत्र आल्यास सर्व आधुनिक कृषी तंत्रज्ञान देणे सोयीचे होइल. गावशिवाराचे उत्पादन वाढेल. श्री. घुगे म्हणाले, की माझे गाव या गटशेतीत समावेश केले. आम्हा सर्वांना दर महिन्याला गटशेतीतून कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळते. डॉ. कापसे यांचे सतत मार्गदर्शन मिळते, त्यामुळे माझी फळबागेची शेती चांगलीच बहरली आहे आणि उत्पन्नात भर पडली.
डॉ. पवार म्हणाले, की वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित विविध पिकाचे सुधारित कृषी तंत्रज्ञानाची अवलंब शेतकऱ्यांनी करावा, यामुळे उत्पादन खर्च कमी होईल. श्री. सवडे यांनी गटशेतीमुळे अनेक गावातील शेतकरी कसे अधिक पीक उत्पादन घेतात याची माहिती करून दिली.
श्री. ठोंबरे म्हणाले, की जोपर्यंत गावातील तरुण शेतकरी एकत्रित शेती करण्यासाठी येणार नाही, तोपर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान पोचणे अशक्य असते. याकरिता आपसांतील सर्व मतभेद विसरून शेतीसाठी एकत्र या. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ज्ञानेश्वर मिसाळ, शेतकरी मित्रमंडळानी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन भाऊराव आटफळे यांनी केले. आभार ज्ञानेश्वर मिसाळ यांनी मानले. कार्यक्रमास शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.