Agrowon Award : पुरस्कार सोहळ्यात उद्योजकांना मिळाली प्रेरणा

पुणे- सकाळ-ॲग्रोवनच्या वतीने आयोजित ‘ॲग्रोवन बिझनेस एक्सलन्स ॲवॉर्डस वितरणाचा कार्यक्रम पुणे येथे रविवारी (ता.८) दिमाखदारपणे पार पडला. उपस्थित उद्योजक पुरस्कारार्थींचा सन्मान होताना त्यांना यावेळी तज्ज्ञांचे मार्गदर्शन झाले. त्यातून भावी वाटचालीसाठी प्रेरणा आणि दिशाही मिळाली.
Agrowon Award : पुरस्कार सोहळ्यात उद्योजकांना मिळाली प्रेरणा

सकाळ-ॲग्रोवनच्या वतीने रविवारी (ता. ८) ‘ॲग्रोवन बिझनेस एक्सलन्स ॲवॉर्डस (Agrowon Business Excellence Award) वितरणाचा कार्यक्रम एका दिमाखदार सोहळ्यात पार पडला. कृषी उद्योग (Agriculture Industry) जगतात उल्लेखनीय कामगिरी केलेले उद्योजक, त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार असे सर्वजण यावेळी आवर्जून उपस्थित होते. यावेळी महेश गायकवाड यांनी सूत्रसंचालन करताना कार्यक्रमात रंगत भरली आणि पुरस्कारार्थींना उद्योग वाढीसाठी प्रोत्साहन दिले.

त्यावेळी उपस्थित उद्योजकांनी टाळ्यांच्या कडकडाटासह चांगलाच प्रतिसाद दिला. पुरस्कार स्वीकारताना संबंधित उद्योजकांचे परिचित हा मोलाचा क्षण कायम संग्रही ठेवण्यासाठी आपल्या मोबाईल संचामध्ये कैद करीत होते.

Agrowon Award : पुरस्कार सोहळ्यात उद्योजकांना मिळाली प्रेरणा
Agrowon Business Excellence Awards 2022 : नवतंत्रज्ञानाने बनवलेली उत्पादने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणारी `आयआयएल’ कंपनी

यावेळी बोलताना सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार (Prataprao Pawar) म्हणाले की ॲग्रोवनने (Agrowon) आतापर्यंत असंख्य यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा प्रसिद्ध केल्या आहेत. त्यातून अन्य शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळाले आहे.

आता कृत्रीम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवे संशोधन येऊ घातल्याने त्यातून शेती व शेतकऱ्यांमध्ये अजून नक्कीच बदल घडून येतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. डिजिटल पद्धतीचे शिक्षण, सतत सुधारणा, खर्चात बचत करणे, जास्तीत सेवा देणे यातून उद्योजकांना दिशा देण्याचा कानमंत्र श्री. पवार यांनी दिला

‘प्राज इंडस्ट्रीज चे संस्थापक व कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी उद्योजकांना महत्त्वाच्या टिप्स दिल्या. आपला व्यवसाय वाढत असताना समोरील आव्हाने, त्यातून मार्ग कसा काढावा याबाबत मार्गदर्शन केले.

ग्राहक हा मुख्य केंद्रबिंदू मानत असताना त्याच्या प्रतिक्रिया महत्त्वाच्या असल्याचे ते म्हणाले. उद्योगात ‘डाटा’, डिजिटल तंत्रज्ञान व त्याचे मार्केटिंग’ यांचे महत्त्व त्यांनी विशद केले.

ॲग्रोवनचे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण म्हणाले की स्वकष्टातून पुढे आलेले व उद्योगात नावलौकिक वाढविलेले उद्योजक कार्यक्रमाच्या निमित्ताने एका व्यासपीठावर आले आहेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी ॲग्रोवनने पुढाकार घेतला आहे.

ॲग्रोवनने सरपंच महापरिषदेतून सरपंचांना प्रेरणा दिली. त्यातून गावांमध्ये चांगलेच बदल झाले आहेत. शेतीचे चित्रही बदलत असून विविध विषयांतील यशोगाथा शेतकऱ्यांपर्यंत पोचवल्या जात आहोत.

ॲग्रोवन ‘डिजिटल’च्या माध्यमातूनही शेतकऱ्यांपर्यंत पोचत आहे असे ते म्हणाले. शेतकऱ्यांप्रती असलेली सरकारची भूमिका बदलणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. ॲग्रोवनचे सरव्यवस्थापक बाळासाहेब खवले यांनी आभार मानले.

असे आहेत पुरस्कारार्थी उद्योजक

सुशील हडदरे (चेअरमन व कार्यकारी संचालक, हडदरे ट्रेडिंग कंपनी)

शरद पाटील (संचालक, केमिनोवा ॲग्रोटेक)

कैलास पाटील (संचालक, केमिनोवा ॲग्रोटेक)

करण पाटील (संचालक, केमिनोवा ॲग्रोटेक)

महेश कांबळे (संस्थापक, एथिक्स वॉटर कंडिशनर)

पल्लवी नवले (संस्थापक संचालक, एथिक्स वॉटर कंडिशनर)

उद्धव आहिरे (अध्यक्ष, आनंद ॲग्रो ग्रुप)

नंदकुमार साळुंके (व्यवस्थापकीय संचालक, क्रिष्णा ॲग्रो सोल्यूशन्स)

बापूशेठ पिंगळे (संचालक, परफेक्ट कृषी मार्केटयार्ड लिमिटेड)

दीपकशेठ पिंगळे (संचालक, परफेक्ट कृषी मार्केटयार्ड लिमिटेड)

डॉ.विनोद कुलकर्णी (व्यवस्थापकीय संचालक, व्हीआरके न्यूट्रिशनल)

अमोल मवाळ (कार्यकारी संचालक, सक्सेस बीज सायन्स प्रा.लि..)

ब्रीजभूषण खांडल (संचालक, वैष्णवी बायोटेक)

डॉ.जयेंद्र शर्मा (संचालक, वैष्णवी बायोटेक)

ज्ञानेश्वर गाजरे (संचालक, ऑर्चिड क्रॉप सायन्स),

कृष्णा अंधारे (संचालक, श्रीमती सुमित्राबाई अंधारे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर)

संभाजी चव्हाण (संचालक, यूएसके ॲग्रो)

उमाकांत माळी (संचालक, यूएसके ॲग्रो)

मारोतराव पाटील (अध्यक्ष, के गुरुजी मिल्क प्रॉडक्टस्)

Agrowon Award : पुरस्कार सोहळ्यात उद्योजकांना मिळाली प्रेरणा
Agrowon Business Excellence Awards 2022 : सुदृढ पशुधनातून विकासाची कास हाच वेट्रिनाचा ध्यास

विठ्ठलराव वाडगे (संस्थापक, चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समिती)

सुरेश वाबळे (संस्थापक अध्यक्ष, प्रेरणा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था)

डॉ.मंगेश घाडीगांवकर (संस्थापक संचालक, वेट्रिना हेल्थकेअर प्रा.लि.)

अमरसिंह पाटील (संस्थापक सीईओ, ग्रीन रिव्होल्यूशन्स)

नितीन गिरे (मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी नेचर वॉटर केअर)

पराग जोशी (संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक, जोशी ॲग्रोकेम फार्मा)

ॲड व्यंकटराव गुंड पाडोळीकर (संस्थापक, रुपमाता उद्योग समूह मित्र मंडळ)

बालाजी भोसले (मालक, शिवनेरी रोपवाटिका)

नबीलाल मुजावर (संचालक, नॅशनल ॲग्रो पॉलिक्लिनिक)

संजय देशमुख (संस्थापक संचालक, मी शेतकरी)

राजेश अग्रवाल (व्यवस्थापकीय संचालक, इनसेक्टिसाईडस् इंडिया लिमिटेड)

एल.एस.डोळे (संचालक, मल्टिमोल मायक्रो फर्टिलायझर्स इंडस्ट्रीज)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com