देशी झाडे वाचली तरच पर्यावरण वाचेल

दुर्मीळ तसेच नामशेष होत चाललेल्या पश्‍चिम घाटातील वनस्पतींचे संवर्धन करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे यावे. त्यासाठी देशी वृक्षांची रोपे तयार करून वनस्पती बँक तयार करणे आवश्यक आहे.
Tree Planting
Tree PlantingAgrowon

पिरंगुट, ता. मुळशी ः ‘‘दुर्मीळ तसेच नामशेष होत चाललेल्या पश्‍चिम घाटातील वनस्पतींचे संवर्धन (Conservation Of Herbal Plant) करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे यावे. त्यासाठी देशी वृक्षांची रोपे (Tree Seedling) तयार करून वनस्पती बँक (seedling Bank) तयार करणे आवश्यक आहे. देशी झाडे (Indigenous Tree) वाचली तरच पर्यावरण (Environment) वाचेल. त्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे,’’ असे प्रतिपादन सह्याद्री देवराई प्रकल्पाचे संस्थापक व अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी केले.

Tree Planting
Tree Planting : कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त वृक्षारोपण आयोजन

जागतिक वनसंवर्धन दिनानिमित्त मुळशी वनपरीक्षेत्राच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यानिमित्त सह्याद्री देवराई प्रकल्पाचे संस्थापक व अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते भरे (ता. मुळशी) येथील परिसरात आयोजित केलेल्या वृक्षारोपण समारंभात शिंदे बोलत होते. या वेळी उपवनसंरक्षक राहुल पाटील सहायक उपवनसंरक्षक मयूर बोठे, सहायक वनसंरक्षक दीपक पवार, आशुतोष शेंडगे, मुळशीचे वनपरीक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण, वनपाल मल्लिनाथ हिरेमठ, संजय अहिरराव उपस्थित होते.

Tree Planting
शेळ्यांच्या आहारात वापरा या झाडांचा पाला ! | Tree leaves for goat feed | ॲग्रोवन

या वेळी शिंदे म्हणाले, ‘‘वनांचा मानवांसह सर्वच सजीव घटकांच्या जीवनाशी आणि आरोग्याशी थेट संबंध आहे. जंगल टिकले तरच जैवविविधता टिकणार आहे आणि मानव टिकणार आहे, यासाठी वनसंवर्धनाची गरज आहे. यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे.’’

उपवनसंरक्षक पाटील म्हणाले, ‘‘स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या अनुषंगाने १५ ऑगस्ट रोजी संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून ७० वर्षे व त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या ७५ व्यक्तींचा दुर्मिळ वृक्ष प्रजाती भेट देऊन सन्मान करण्यात येणार आहे. त्यामुळे झाडाला घरातील व्यक्ती समजून वृक्षासंबंधी भावनिक नाते तयार होण्यास मदत होईल.’’

वनरक्षक सोनाली राठोड, सारिका दराडे, संतोष मुंढे, कांचन ढोमसे, परमेश्वर कासुळे, राजू मराडे, नेचर अॅण्ड ह्यूमन फाउंडेशनचे शिवाशिष चौधरी, मुळशी आयटीआय कॉलेजचे प्राचार्य व विद्यार्थी तसेच ग्रामस्थ यांनी या वेळी वृक्षारोपण केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com