Malnutrition : मेळघाटातील कुपोषण निर्मूलन महत्त्वाचे

मेळघाटच्या दुर्गम भागाचा दौरा करून त्यांनी परिस्थितीची माहिती घेतली. सर्वप्रथम धारणी तालुक्यातील दिदमदा गावात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अमरसिंग रावत यांच्या घरी भेट दिली, त्यानंतर गावातील कुपोषित बालकांच्या घरी जाऊन पाहणी केली.
Malnutrition
Malnutrition Agrowon

धारणी, अमरावती : मेळघाटातील कुपोषणाचे निर्मूलन (Melghat Malnutrition Eradication) करण्यासोबतच कुपोषित बालकांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शनिवारी (ता.२०) येथे व्यक्त केले. अजित पवार दोन दिवसांच्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी धारणी तालुक्यातील भोकरबर्डी येथील अतिवृष्टीग्रस्त (Heavy Rain) भागाची पाहणी केली. यासोबतच कळमखार येथील प्राथमिक आरोग्यकेंद्राची पाहणी करून येथील स्थितीची माहिती जाणून घेतली.

Malnutrition
Ajit Pawar : दहा लाख हेक्टरचे नुकसान; तरीही भरपाई नाही

मेळघाटच्या दुर्गम भागाचा दौरा करून त्यांनी परिस्थितीची माहिती घेतली. सर्वप्रथम धारणी तालुक्यातील दिदमदा गावात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अमरसिंग रावत यांच्या घरी भेट दिली, त्यानंतर गावातील कुपोषित बालकांच्या घरी जाऊन पाहणी केली. यासोबतच कुपोषित बालकांच्या पालकांची विचारपूस केली. यानंतर दिदमदा गावाच्या अंगणवाडी केंद्राला भेट देऊन तेथील स्थितीची पाहणी केली.

Malnutrition
Ajit Pawar : विकासकामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही

भोकरबर्डी येथे श्रीपाल पाल यांच्या निवासस्थानी सुद्धा त्यांनी भेट दिली. त्यानंतर अजित पवार कळमखार येथे आले. तेथे प्राथमिक आरोग्यकेंद्राला भेट देऊन कुपोषित बालकांची पाहणी करीत डॉक्टर तसेच बालकांच्या पालकांशी चर्चा केली. त्यानंतर ते नारवाटी येथे पोहोचले. गावातील तीन कुपोषित बालकांच्या घरी भेट देऊन पालकांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी रोजगाराची परिस्थितीसुद्धा जाणून घेतली. गावातीलच एका शेताच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणीसुद्धा त्यांनी केली. यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विधिमंडळ समन्वयक संजय खोडके यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, अजित पवार यांचे शनिवारी सकाळी अमरावतीच्या रहाटगाव टी पॉइंट येथे आगमन होताच आमदार सुलभाताई खोडके यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विधिमंडळ समन्वयक संजय खोडके यांनीसुद्धा विरोधी पक्षनेता अजित पवार यांचे स्वागत केले. रहाटगाव रिंग रोड येथे त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com