Miyawaki Forest : मियावाकी जंगलाची सिंदखेडमध्ये उभारणी

मोताळा तालुक्यातील सिंदखेड गावात नागरिकांनी महाश्रमदान करीत ‘सेट्रीज’ या संस्थेसोबत मिळून १० हजार रोपांची लागवड केली.
Miyawaki Forest
Miyawaki ForestAgrowon

बुलडाणा ः मोताळा तालुक्यातील सिंदखेड गावात नागरिकांनी महाश्रमदान करीत ‘सेट्रीज’ या संस्थेसोबत मिळून १० हजार रोपांची लागवड (Tree Plantation) केली. मियावाकी पद्धतीनुसार (Miyawaki Forest Concept) ही रोपे लावण्यात आली, हा एक जिल्ह्यात विक्रम मानला जात आहे.

Miyawaki Forest
Tree Planting : कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त वृक्षारोपण आयोजन

मियावाकी पद्धत ही एक घनदाट पद्धतीने वृक्षारोपण करण्याची परंपरा आहे. जिथे मूळ रोपट्यांच्या प्रजाती एकमेकांच्या जवळ लावल्या जातात. प्रकाश आणि हवेसाठी त्या स्पर्धा करतात. त्यामुळे पारंपरिक जंगलातील रोपांपेक्षा खूप वेगाने वाढ होते.

अशा पद्धतीने वृक्षारोपण करणे हे जंगलाची निर्मिती आणि पर्यावरणाच्या दृष्टीने फायदेशीर मानले जाते. या उपक्रमात गावकऱ्यांसह ५०० विद्यार्थी श्रमदानात सहभागी झाले होते. दीड एकरामध्ये ५५ देशी प्रजातींची रोपे लावण्यात आली. यामध्ये फळझाडे, फुलझाडे तसेच औषधी वनस्पतींचा समावेश आहे.

Miyawaki Forest
Tree Cutting: रानसोबती बनून कसं जगावं ?

गावकऱ्यांनी यासाठी त्यांची जमीन जंगलासाठी उपलब्ध करून दिली. तसेच रोपांना पाणीपुरवठा करणे आणि सुरक्षितता ही जबाबदारी घेतली आहे. ‘सेट्रीज’ या संस्थेने यासाठी लागणारी रोपे उपलब्ध करून दिली.

जमीन तयार करण्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी मदत केली आहे. इतकंच नाहीतर दोन वर्ष झाडांची देखभाल देखीलही करण्याची जबाबदारी घेतली. सिंदखेड हे गाव यापूर्वी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप तसेच फार्मर कप सहभागी झालेले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com