Ethanol Prouction
Ethanol ProuctionAgrowon

Ethanol Blending Program : मळी निर्यातीमुळे इथेनॉल मिश्रण कार्यक्रम धोक्यात

इथेनॉल निर्मितीसाठी देशात मळीची (मोलॅसिस) टंचाई असतानाच ११ लाख टनांहून जास्त मळी निर्यात झाली आहे.

Pune News : इथेनॉल निर्मितीसाठी (Ethanol Production) देशात मळीची (मोलॅसिस) टंचाई (Molasses Shortage) असतानाच ११ लाख टनांहून जास्त मळी निर्यात (Molasses Export) झाली आहे. अब्जावधी रुपयांच्या मळी निर्यातीने केंद्र शासनाच्या इथेनॉल उत्पादन व मिश्रण धोरणावर संकट आणले आहे.

साखर कारखान्यात उसाचे गाळप तयार केल्यानंतर मिळणारी मळी मुख्यत्वे इथेनॉल तसेच इएनए (एक्स्ट्रॉ न्यूट्रल अल्कोहोल) तयार करण्यासाठी वापरली जाते.

देशी व विदेशी दारू आणि इथेनॉल निर्मितीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या मळीला जगात मागणी आहे.

भाव चांगला मिळत असल्याने मळीची निर्यात होते. पण, या निर्यातीने आता देशाच्या इंधन टंचाई समस्येवरील उपायांना खिळखिळे करण्यास सुरुवात केली आहे.

Ethanol Prouction
Ethanol Production : महाराष्ट्रातून ३६ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा

मळी व ‘इएनए’ची निर्यात वाढत असल्यामुळेच देशाच्या मळी बाजारात किमती वाढल्या. सी-हेवी मळी १० हजार रुपये प्रतिटन तर बी-हेवी १३ हजार रुपये, रेक्टिफाइड स्पिरीट ६५ रुपये लिटर, इएनए ६६ रुपये तर ‘एसडीएस’ ५६ रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली आहे.

मळीचा वापर इतर उत्पादनांमध्ये करून नफा कमावणे हे साखर कारखान्यांसाठी सोपे झाले आहे.

त्यामुळे महागडी मळी विकत घेऊन तोट्यात जाणारे इथेनॉल तयार करणे परवडत नाही. त्यामुळे इथेनॉल उत्पादन अपेक्षेप्रमाणे वाढत नाही, असे इथेनॉल उत्पादन क्षेत्रातून सांगण्यात आले.

मिश्रण कार्यक्रम साध्य करण्यासाठी ज्यूस,बी-हेव्ही,सी-हेव्ही,धान्य यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलकरीता केंद्र शासनाकडून वेगवेगळे आकर्षक खरेदी दर दिले जात आहेत. आहे. परंतु, चांगले दर असूनही इथेनॉल निर्मिती अपेक्षेप्रमाणे वाढलेली नाही.

Ethanol Prouction
Ethanol Market : तेल कंपन्यांबरोबर इथेनॉलचे ४९६ कोटी लिटरचे करार

मळी निर्यातीचे अडथळे

देशाला इंधन आयातीपोटी सध्या ५५१ बिलियन (एक बिलियन म्हणजे अंदाजे ७ हजार कोटी रुपये) इतके परकीय चलन मोजावे लागत आहे.

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण १० टक्के इतके असून त्यामुळे वर्षाकाठी ३० हजार कोटी रुपये वाचू शकतील. इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट २०२४ पर्यंत २० टक्के; तर २०३० पर्यंत ३० टक्के ठेवले गेले आहे.

मळीपासून सध्या ५५० कोटी लिटर इथेनॉल मिळते आहे व हीच निर्मिती क्षमता २०२६ पर्यंत ७६० कोटी लिटरच्या पुढे नेण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पण, त्यात मळी निर्यातीने अडथळे येत आहेत.

Ethanol Prouction
Ethanol Market : इथेनॉलचे तेल कंपन्यांबरोबर किती झाले करार?

इथेनॉल निर्मिती न वाढण्याची कारणे...

- एप्रिल २०२२ ते डिसेंबर २०२२ या केवळ नऊ महिन्याच्या कालावधीत देशातून ११.५२ लाख टन मळीची निर्यात

- १८ कोटी लिटर ‘इएनए’देखील निर्यात. इएनए निर्यातीसाठी देशातील ६.५० लाख टन मळीचा झाला वापर

- निर्यातीसाठी एकूण १८ लाख टन मळीचा झाला वापर. त्यापासून ५४ कोटी लिटर इथेनॉल तयार झाले असते. - म्हणजेच देशाच्या इथेनॉल मिश्रण कार्यक्रमासाठी तेव्हडे इथेनॉल कमी पडले

मळी निर्यात तत्काळ रोखा

तेल विपणन कंपन्यांकडून इथेनॉल खरेदीसाठी निविदा काढल्या जातात. यंदा या निविदांना कमी प्रतिसाद मिळत आहे. त्याचे मुख्य कारण मळी निर्यात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

“मळी आणि इएनए निर्यातीला पायबंद घातल्याशिवाय देशाचा इथेनॉल मिश्रण कार्यक्रम कधीही यशस्वी होणार नाही. निर्यात रोखण्यासाठी निर्यात करात तत्काळ वाढ करण्याचा पर्याय केंद्र शासनाकडे आहे.

मात्र, ही समस्या माहीत असूनदेखील निर्णय घेतला जात नसल्याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटते आहे,” असे एका साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकाने सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com