Rain : पूरस्थितीमुळे २००० नागरिकांचे स्थलांतर

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या बचाव कार्यामध्ये ६५८ कुटुंबातील २०४१ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
Bhandara Flood
Bhandara FloodAgrowon

भंडारा : संततधार पावसामुळे (Bhandara Rain) मंगळवारपासून (ता.१६) पासून गोसीखुर्द धरणाच्या पाणीपातळीत (Gosikhurd Dam Water Level) वाढ झाली असल्याने भंडारा तालुका, भंडारा शहर, तुमसर, मोहाडी तालुक्यातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वाडी, वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. परिणामी दोन हजारांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर (Evacuation of 2000 citizens) करण्यात आले आहे. बुधवारी (ता.१७) जिल्ह्यात २२ रस्ते वाहतुकीसाठी बंद होते.

Bhandara Flood
भंडारा जिल्ह्यात २७ लाख क्‍विंटल धान खरेदी

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या बचाव कार्यामध्ये ६५८ कुटुंबातील २०४१ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तसेच पूरग्रस्तांच्या निवासाची व भोजनाची सोय प्रशासन व स्वयंसेवी संघटनामार्फत करण्यात आली आहे. पूरग्रस्त भागांमध्ये प्रामुख्याने कारधा, गणेशपूर, भोजापूर, सालबर्डी, दाभा, कोत्थूरणा, दवडीपार, कचरखेडा, पिंडकेपार, कोरंबी, लावेश्वर, खमारी व भंडारा शहरातील गणेशनगरी, ग्रामसेवक कॉलनी, टप्पा मोहल्ला, मेंढा बायपास रोड ,मिशन स्कूल समोरचा भाग, गुजराती कॉलनी आणि कपिल नगर, भोजापूर भागांतील कुटुंबांना बचाव निवारा येथे स्थलांतर करण्यात आलेले आहे.

Bhandara Flood
भंडारा जिल्ह्यातील ८८ महिलांना आर्थिक मदत

या सर्व नागरिकांची व्यवस्था प्रकाश हायस्कूल, कारधा, जिल्हा प्राथमिक शाळा कारधा, जिल्हा परिषद शाळा गणेशपूर, ग्रामपंचायत कार्यालय सभागृह, समाज मंदिर, सालबर्डी तसेच लवेश्वर, खमारी येथील जिल्हा परिषद शाळा आणि मेहतर समाज मंदिर, भंडारा तसेच नगरपरिषद गांधी विद्यालय, भंडारा आणि कहार समाज मंदिर मेंढा येथे करण्यात आली आहे. वैनगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने पाऊस झाल्याने वेळोवेळी गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

विसर्गाची व जिल्ह्यातील पर्जन्यमानाची माहिती आपत्ती विभागाने तयार केलेल्या चॅट बोटद्वारे देण्यात आली. तसेच जिल्ह्यातील सर्व क्षेत्रीय अधिकारी व महत्त्वाचे विभाग महावितरण, पोलिस विभाग, नगर परिषद विभाग आणि ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या व क्षेत्रीय स्तरावरील कर्मचारी बचाव कार्यात आहेत. जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्यासह नगर परिषद मुख्याधिकारी विनोद जाधव तसेच पोलिस विभागाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यासह विविध यंत्रणांचे अधिकारी प्रत्यक्ष पूर परिस्थिती ठिकाणी जाऊन मदत कार्यात सहभागी झाले होते.

तुमसर तालुक्यातील सुकडी,( नकुल) चुल्हाड, ब्राह्मणी, सुकडी देव गावांतील बारा व्यक्तींना बचाव पथकाने निवारा प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा, ब्राह्मणी आणि जिल्हा परिषद शाळा, सुकळी देव येथे हलविले. मोहाडी तालुक्यातील मुंढरी बुद्रुक आणि महालगाव येथील घरात पाणी गेलेल्या नागरिकांचा तातडीने बचाव करून त्यांची व्यवस्था जिल्हा परिषद नूतन विद्यालय, मुंढरी आणि समाज मंदिर महालगाव येथे करण्यात आली.

पुराची तीव्रता कायम

बुधवारी (ता.१७) गोसेखुर्द प्रकल्पातून होणारा विसर्ग कमी असला तरी पुराची तीव्रता मात्र कायम आहे. पूर ओसरल्यानंतर नागरिकांना आपल्या गावात जाता येणार आहे. जिल्ह्यात बावीस रस्ते बंद होते त्यामध्ये भंडारा तालुक्यात १०, पवनी चार, तुमसर एक, मोहाडी सहा तर लाखांदूर तालुक्यातील एक रस्ता बंद आहे. ८६४ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com