स्वातंत्र्यानंतरही देश भीतीच्या छायेत ः गांधी

‘देश स्वातंत्र्यानंतरही भीतीच्याच छायेत आहे, असे मला जाणवते,’’ अशी खंत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केली.
Tushar Gandhi
Tushar GandhiAgrowon

सांगली ः ‘‘देश स्वातंत्र्यानंतरही भीतीच्याच छायेत आहे, असे मला जाणवते,’’ अशी खंत राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचे पणतू तुषार गांधी (Tushar Gandhi) यांनी व्यक्त केली. सांगली येथील शांतिनिकेतन विद्यापीठात (Shantiniketan University) शुक्रवारी (ता. २) क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित स्वातंत्र्य संग्राम जागर मेळाव्यात गांधी बोलत होते. क्रांतिअग्रणी उद्योग समूहाचे संचालक, आमदार अरुण लाड अध्यक्षस्थानी होते.

Tushar Gandhi
Fisheries Technology : नव्या मत्स्यपालन तंत्रज्ञानामुळे वाढले उत्पन्न

या वेळी डॉ. बाबूराव गुरव, ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव, किरण लाड उपस्थित होते. या वेळी स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात आला. जागर मेळाव्यानिमित्त फेरी देखील काढण्यात आली.

Tushar Gandhi
Agriculture Technology : विद्यापीठाचे तंत्रज्ञान वापरून उत्पादन वाढवावे

गांधी म्हणाले, ‘‘आजही प्रतिसरकारची गरज आहे. आताचे सरकार गद्दार आहे. याच सरकारमधील लोक स्वातंत्रलढ्यावेळी इंग्रजांसोबत होते, तरीही आपण आझादीचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. आजही पाणी पिण्यावरून सवर्ण मागासवर्गीयांवर अत्याचार करत आहोत आणि यावर पंतप्रधानांनी कसलेही भाष्य केले नाही. त्यातून कसली लोकशाही दिसून येते, ही तर राजेशाही आहे.’’

महाराव म्हणाले, ‘‘सांगली, सातारा, कोल्हापूर स्वातंत्र्यसैनिकांची कर्मभूमी आहे. आपण त्यांचे वारसदार आहोत. वसा घ्यावा लागतो, पण वारसा टिकवावा लागतो. आमदार अरुण लाड यांनी जी. डी. बापूंचा वारसा समर्थपणे टिकविला आहे.’’ लाड म्हणाले, ‘‘दिशाहीन लोकांना दिशा देण्यासाठी अशा व्याख्यानांचे आयोजन होणे गरजेचे आहे. आताचे सरकार लबाड आहे. त्यांच्यावर विश्वास न ठेवता आपल्याला हवे ते स्वकर्तुत्वातून कमवू. त्यासाठी चळवळी सुरू झाल्या पाहिजेत. ’’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com