Electricity Supply : आठ तासही सुरळीत वीज मिळेना

नांदेड जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामातील पेरणी सुरू आहे. आजपर्यंत एक लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. यात गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, करडई या रब्बी पिकांचा समावेश आहे.
Agriculture Electricity
Agriculture Electricity Agrowon

नांदेड : जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामातील (Rabi Season) पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी विद्युत पंपांची जोडणी (Agriculture Pump) करीत आहेत. परंतु जिल्ह्याच्या अनेक भागांत आठ तास मिळणारी थ्रीफेस वीज टिकत नसल्याने शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध असूनही पिकांना देता येत नाही. परिणामी खरिपानंतर रब्बी हंगामही हातून जाण्याची शक्यता आहे.

Agriculture Electricity
Electricity : वीजप्रश्‍नी शेवगावला शेतकरी आक्रमक

नांदेड जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामातील पेरणी सुरू आहे. आजपर्यंत एक लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. यात गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, करडई या रब्बी पिकांचा समावेश आहे. तर खरिपातील कपाशी व तूर या पिकांनाही पाण्याची आवश्यकता असल्याने शेतकरी कृषिपंपाची जोडणी करत आहेत.

Agriculture Electricity
Electricity : महिलांच्या आंदोलनानंतर वीज रोहित्र बुधवारपर्यंत बसवणार

जिल्ह्यात महावितरणकडून आठ दिवस दिवसा तर आठ दिवस रात्रीच्यावेळी आठ तास थ्रीफेज वीज दिली जाते. परंतु मागील पंधरा दिवसांपासून थ्रीफेज वीज टिकत नाही. एक तासात आठ ते दहावेळा ट्रीप होत असल्याने शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध असून ते पिकांना देता येत नाही. परिणामी रब्बीच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. या बाबत जिल्हा प्रशासनाने महावितरण कंपनीला निर्देश देऊन शेतकऱ्यांना योग्य दाबाने किमान आठ तास वीज मिळेल याची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com