सत्ता नसली तरीही जनतेचे प्रश्‍न सोडवू

आदी पुनर्वसन मग धरण हे कितीही हक्काने सांगत असलो तरी धरणग्रस्तांचे प्रश्‍न सुटण्यास अनेक अडचणी असतात. आमची सत्ता नसली तरी धरणग्रस्तांचे प्रश्‍न जिल्ह्यातील नेत्यांच्या एकजुटीने सोडवू,’’ असे प्रतिपादन आमदार जयंत पाटील यांनी केले.
Jayant Patil
Jayant PatilAgrowon

आजरा, जि. कोल्हापूर : ‘‘आदी पुनर्वसन (Rehabilitation) मग धरण हे कितीही हक्काने सांगत असलो तरी धरणग्रस्तांचे (Dam Affected) प्रश्‍न सुटण्यास अनेक अडचणी असतात. आमची सत्ता नसली तरी धरणग्रस्तांचे प्रश्‍न जिल्ह्यातील नेत्यांच्या एकजुटीने सोडवू,’’ असे प्रतिपादन आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले. उचंगी (ता. आजरा) येथील प्रकल्पस्थळावर जलपूजनप्रसंगी ते बोलत होते.

Jayant Patil
Crop Damage : अडचणीतील शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घ्या ः जयंत पाटील

माजी मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जयवंतराव शिंपी, सुधीर देसाई, रामाप्पा करिगार, भिकूमामा गावडे, बाबासाहेब पाटील, रचना होलम उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘‘महाविकास आघाडीच्या काळात प्रकल्पांना निधी मिळाला. उचंगीसाठी राजेश पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने प्रकल्प मार्गी लागला. बाबासाहेब कुपेकर, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, नरसिंगराव पाटील, माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी प्रयत्न केले.’’

Jayant Patil
Natural Calamity: सरकारने शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी : जयंत पाटील

राजेश पाटील म्हणाले, की प्रकल्पग्रस्तांचा त्याग मोठा आहे. महाविकास आघाडीतील सर्वांचीच मदत झाली आहे. धरणकृती समिती सदस्य, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांसह तत्कालीन लोकप्रतिनिधींचे यासाठी सहकार्य मिळाले आहे. मुश्रीफ म्हणाले, ‘‘पॅकेज जाहीर करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेक प्रकल्प पूर्णत्वाकडे गेले. प्रकल्पग्रस्तांचे उर्वरित प्रश्‍न सोडविण्यासाठी भर राहील.’’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com