मराठवाड्यात प्रत्येकाला रोजगाराभिमुख करणार

कौशल्यपूर्ण रोजगाराचे शिक्षण देऊन मराठवाड्यातील प्रत्येकाला रोजगाराभिमुख करण्यात येईल,’’ अशी ग्वाही पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
Mangal Prabhat Lodha
Mangal Prabhat LodhaAgrowon

‘‘पंतप्रधान महारोजगार मेळाव्यांना (Prime Minister Maharojgar Mela) मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या प्रकारचे मेळावे यापुढेही आयोजित करण्यात येतील. कौशल्यपूर्ण रोजगाराचे शिक्षण देऊन मराठवाड्यातील (Marathwada Rojgar Melava) प्रत्येकाला रोजगाराभिमुख करण्यात येईल,’’ अशी ग्वाही पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी दिली.

Mangal Prabhat Lodha
Sharad Pawar : ‘रयत’च्या पाठीशी नगरकरांचा मजबूत पाठिंबा : शरद पवार

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे दोन दिवसीय पंतप्रधान कौशल्य विकास, उद्योजकता, अप्रेंटिसशिप व महारोजगार मेळाव्याचे उद्घाटन लोढा यांच्या हस्ते झाले. या वेळी औरंगाबाद येथील नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. स्टार्टअप प्रदर्शन, उद्योजकता मार्गदर्शन आणि करिअर समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Mangal Prabhat Lodha
Goat Farming : शेळीपालनातून आर्थिक प्रगतीची दिशा

वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आमदार हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब, प्रधान सचिव मनिषा वर्मा, आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह, संचालक दिगंबर दळवी, उपायुक्त सु. द.सैंदाणे, सहायक आयुक्त सुरेश वराडे आदी उपस्थित होते.

Mangal Prabhat Lodha
Natural Farming : नैसर्गिक शेती आणि मातीतले खनिज घटक

लोढा म्हणाले,‘‘राज्यात आगामी दोन वर्षांत पाच लाख उमेदवारांना रोजगार उपलब्ध होईल, या दृष्टिने प्रयत्न करण्यात येतील.’’ कौशल्य पदवी प्रदान सोहळ्यात सर्व मान्यवरांनी पदवी दीक्षांत पोशाख घालून उमेदवारांना पदवी प्रमाणपत्र प्रदान केले. प्रातिनिधिक स्वरूपात कंपनीत अप्रेंटीसशिप म्हणून निवड झालेल्या पाच उमेदवारांना मंत्री लोढा यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. ‘‘रोजगारक्षम अभ्यासक्रमावर भर देऊन विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत,’’ अशी अपेक्षा डॉ. कराड यांनी व्यक्त केली.

औरंगाबाद : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे दोन दिवसीय पंतप्रधान कौशल्य विकास, उद्योजकता, अप्रेंटिसशिप व महारोजगार मेळाव्याला उपस्थित मंत्री मंगलप्रभात लोढा आणि इतर मान्यवर.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com