साखर उद्योगाच्या हितासाठी सगळ्यांनी एकत्र यावं- मुख्यमंत्री

साखर उद्योग हा महाराष्ट्राचा मुख्य उद्योग आहे. साखरेचे महत्व लक्षात घेता पुढील नियोजन करणे गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
साखर उद्योगाच्या हितासाठी सगळ्यांनी एकत्र यावं-  मुख्यमंत्री
Vasantdada Sugar Institute Agrowon

साखर उद्योगाच्या (Sugar Factory) हितासाठी तज्ज्ञानी एकत्र येत भविष्यात येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन धोरण आखल्यास त्याचा साखर उद्योगावर चांगला परिणाम होईल. त्यामुळे तज्ज्ञानी एकत्र येत धोरण आखले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (Vasantdada Sugar Institute) आयोजित साखर परिषद-२०२२ मध्ये बोलत होते. साखर उद्योग हा महाराष्ट्राचा मुख्य उद्योग आहे. साखरेचे महत्व लक्षात घेता पुढील नियोजन करणे गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

पुढे मुख्यमंत्री म्हणाले, "साखरतेला गोडवा पवार साहेबांनी राजकारणात आणला आणि सर्व पक्षाचे नेते पक्षीय जोडे काढून राज्य आणि देशाचुआ हिताचा विचार करत आहेत, ही निश्चित चांगली बाब आहे. इथनॉल निर्मितीला राज्य सरकार प्रोत्साहन देत आहे. इथेनॉलकडे पर्यायी इंधन म्हणून पाहिले पाहिजे."

राज्यातील ऊस कारखान्यांचा तोटा, ब्राझीलचं ऊसउत्पादनाचं मॉडेल यावरही मुख्यमंत्र्यांनी मत व्यक्त केले. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "ऊसतोड कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगारांसाठी महामंडळ स्थापन केले आहे. त्या माध्यमातून ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडविता येतील."

कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, विश्वजित कदम, सतेज पाटील, शंभुराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, हेमंत पाटील, साखर आयुक्त शेखर गायकवाड, राष्ट्रीय सहकारी कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर आदी उपस्थित होते.कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, विश्वजित कदम, सतेज पाटील, शंभुराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, हेमंत पाटील, साखर आयुक्त शेखर गायकवाड, राष्ट्रीय सहकारी कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर आदी उपस्थित होते.

दरम्यान, यंदा महाराष्ट्राने साखर उत्पादनात उत्तरप्रदेशला मागे टाकले आहे. गाळप हंगाम संपला तरीही १ जूनपर्यंत महाराष्ट्रात तीन लाख टन ऊस शिल्लक आहे. त्यामुळे शेतकरी चिंता व्यक्त करू लागले आहेत. मात्र राज्य सरकारने सगळा ऊस गाळप करण्याचा दावा केला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com