शिवारात सारं काही ‘ओके’ नाहीच!

आपत्तिग्रस्त शेतकऱ्यांचे मदतीसाठी डोळे सरकारकडे
Crop Damage
Crop Damage Agrowon

नागपूर ः ‘काय पाऊस, काय नुकसान, काय घरांची पडझड, जनावरांचा मृत्यू’ त्यामुळे शिवारात सार काही ओके नसतानाच राज्यकर्त्यांकडून मात्र पाहणी दौऱ्याची औपचारिकता केली जात असल्याने प्रत्यक्ष भरपाई (Crop Damage Compensation) केव्हा मिळणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे जुलै महिन्यातच सत्ता सांभाळल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीचा दौरा केला. त्यानंतर अनेकांचे दौरे झाले, मात्र मदतीऐवजी आश्‍वासनांवरच शेतकऱ्यांची बोळवण करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष व्याप्त आहे.

Crop Damage
Crop Damage : ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीचा ५ हजार हेक्टरला फटका

वातावरणातील बदलाचे परिणाम शेती क्षेत्राला (Agriculture Sector) गेल्या काही वर्षांपासून सातत्याने बसत आहेत. गेल्या हंगामात ऐन पीक कापणीच्या (Crop Harvesting) वेळी झालेल्या पावसाने उत्पादकतेवर परिणाम झाला. अनेक शेतकऱ्यांना एकरी एक क्‍विंटलपर्यंतही सोयाबीन झाले नाही. यंदा ती तूट भरून निघेल आणि हंगाम समाधानकारक राहील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु पूर्व विदर्भातील धान पट्ट्यासह पश्‍चिम विदर्भातील पारंपरिक पिके घेणाऱ्या भागात अतिवृष्टी झाली.

Crop Damage
Crop Damage : अमरावती जिल्ह्यातील ३१ टक्के क्षेत्रातील खरीप बुडाला

जून महिन्यात खंड देत चिंता वाढविणारा पाऊस जुलै महिन्यात मात्र धो-धो बरसला. त्याच्या परिणामी पूर्व विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या सहा जिल्ह्यांत सुमारे ४ लाख ७९ हजार हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. जुलै महिन्यातच अमरावती विभागात समावेशीत अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वाशीम या पाच जिल्ह्यांत ६ लाख ३५ हजार ७७९ हेक्‍टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला. जुलै महिन्यात झालेल्या नुकसानीची सर्व्हेक्षण आणि पंचनामे पूर्णत्वास गेले. परंतु ऑगस्टमधील सर्व्हेक्षण आणि पंचनाम्याची कारवाई सुरू आहे.

येत्या पाच दिवसांत ते पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जुलै महिन्यातच राज्यात सत्तापालट झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात पाहणी केली. त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही नुकसानग्रस्त भागाला भेट दिली. परंतु राजकारण्यांच्या या दौऱ्यानंतरही शेतकऱ्यांची झोळी मात्र रिकामीच राहिली आहे.

‘मदत नको पण दौरे आवरा’ असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे शनिवारी (ता. २०) उमरखेड तालुक्‍यातील मार्लेगावला नुकसान पाहणी करणार होते. नियोजित दौरा २ वाजता होता. शेतकऱ्यांना ताटकळत ठेवत कृषिमंत्री संध्याकाळी साडेसातला पोहोचले. रात्रीच्या अंधारात त्यांनी काय पाहणी केली असेल? त्यावरून राज्यकर्त्यांच्या हेतूवरच शंका येते. राज्यकर्त्यांनी आता दौऱ्यांचा खेळ न खेळता थेट मदतीबाबत निर्णय घेतला पाहिजे.
- मनीष जाधव, जिल्हाध्यक्ष, शेतकरी स्वाभिमानी संघटना, यवतमाळ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषिमंत्री पदाची जबाबदारी सोपविल्यानंतर तत्काळ राज्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करण्याचे निर्देश दिले होते. अमरावती, नागपूर विभागांत नुकसान सर्वाधिक आहे. त्यामुळे या भागाचा दौरा केला. सोमवारी (ता. २२) अहवाल सोपविल्यानंतर मुख्यमंत्री मदतीबाबत घोषणा करतील. शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नाही. मदतीसाठी शेतकऱ्यांना ताटकळत ठेवणारे हे सरकार नाही. -
अब्दुल सत्तार, कृषिमंत्री

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com