नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

मालेगाव तालुक्यात मुसळधार; शेतकऱ्यांना दिलासा
Rain Update
Rain UpdateAgrowon

नाशिक : जिल्ह्यात मृग नक्षत्रावर पावसाची (Rain) आशा लागून असताना शेवटी प्रतीक्षाच करावी लागली. अखेर बुधवारी (ता.२२) आर्द्रा नक्षत्र लागल्यानंतर सर्वदूर पावसाने (Rainfall) हजेरी लावली. प्रामुख्याने देवळा, मालेगाव, कळवण, चांदवड व बागलाण तालुक्यांत जोरदार पावसामुळे (Heavy Rain) सर्वत्र पाणीच पाणी झाले. अनेक ठिकाणी पहिल्याच पावसात ओढे, नाले खळाळून वाहिले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मालेगाव तालुक्यात मुसळधार पावसामुळे (Rain Update) काही शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

मालेगाव तालुक्यातील मालेगाव शहरासह दाभाडी, वडनेर करंजगव्हाण, झोडगे, कळवाडी, सायने व निमगाव परिसरात पावसाने परिसर व्यापून टाकला. दाभाडी परिसरात मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची धावपळ उडाली. काही शेतकऱ्यांच्या शेतातून बांध ओलांडून पाणी वाहिले. अनेक भागांत ओढ्या, नाल्यांना पाणी आले. त्यामुळे परिसरातील सिमेंट बंधारे, पाझर तलाव भरल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.

सटाणा तालुक्यात पाऊस सर्वच महसूल मंडळांमध्ये बरसला. नामपूर, ब्राह्मणगाव, मुल्हेर, डांगसौंदाणे परिसरातही पावसाने हजेरी लावली. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली. पावसामुळे काकडगाव येथील मालेगाव-नामपूर रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला. कळवण तालुक्यातील नविबेज, मोकभनगी, कनाशी व अभोणा परिसरात जोरदार सरी बरसल्या. शेतात पाणी साचून काही ठिकाणी बांध फुटले. देवळा तालुक्यात देवळा, लोहणेर व उमराणे या तिन्ही महसूल मंडळांत पाऊस झाला.

निफाड तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. ओझर व सायखेडा महसूल मंडळात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. खेडलेझुंगे, कोळगाव, रुई, नांदूर मधमेश्वर व देवगाव परिसरात पावसाची दमदार हजेरी लागली. दरम्यान, शिवडे (ता. सिन्नर) येथे दुपारी ४ वाजेच्या सुमारास रवींद्र पवार हा तरुण शेळ्या चारण्यासाठी केला असता वीज पडून त्याचा मृत्यू झाला.

तालुकानिहाय पावसाची स्थिती : (ता. २२ रोजी)

तालुका... सरासरी पाऊस (मिमी)

मालेगाव...५८.६

बागलाण...४०.९

कळवण...५६.१

नांदगाव...१९.२

सुरगाणा...३४.१

नाशिक...३०.६

दिंडोरी...२१.३

इगतपुरी...१४.५

पेठ...१८

निफाड...३५.९

सिन्नर...२०

येवला...६.२

चांदवड...४६.२

त्र्यंबकेश्‍वर...१६

देवळा...५८.८

एकूण...३३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com