Water Storage : घाटशिळ पारगाव वगळता जिल्ह्यातील धरणे ‘फुल्ल’

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ऑक्टोबरच्या सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत.
Ghatgaon Dam
Ghatgaon DamAgrowon

नगर : यंदा पावसाळा उशिरा सुरू झाला असला, तरी पावसाने मागील दहा वर्षांची सरासरी केव्हाच ओलांडली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ऑक्टोबरच्या सरासरीच्या दुप्पट पाऊस (Heavy Rainfall) झाला आहे. जिल्ह्यातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली (Overflowed Dams) आहेत.

Ghatgaon Dam
Dam Filled : धरणांतील विसर्गात घट जिल्ह्यात पाऊस ओसरला; २१ धरणे शंभर टक्के भरली

त्यामुळे दुष्काळी भागात सुकाळ, तर बागायती भागात ओला दुष्काळ निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र असे असले तरी पाथर्डी तालुक्यातील घाटशीळ पारगाव धरण मात्र कोरडे आहे. सध्या या धरणात ४२ टक्के पाणीसाठा आहे.

Ghatgaon Dam
Ujani Dam : उजनीतून भीमा नदीत सोडलेला विसर्ग बंद

नगर जिल्ह्यात जून महिन्यापासून आतापर्यंत ६१९.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हा सरासरीच्या १३२.९ टक्के पाऊस आहे. सरासरीच्या सर्वाधिक पाऊस अकोले तालुक्यात झाला. त्यामुळे जिल्ह्यात उगम पावणाऱ्या सर्व मोठ्या नद्यांवरील धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत.

Ghatgaon Dam
Jayakwadi Dam : जायकवाडीतून ६६५२४ क्युसेकने विसर्ग सुरू

यातच काही भागांत अतिवृष्टीही झाली. हवामान विभागाने पावसाळ्याच्या सुरुवातीला सरासरी एवढा अथवा त्यापेक्षा थोडा कमी पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र हा अंदाज पावसाने चुकीचा ठरवत जुलै महिन्यापासून जोरदार हजेरी लावली.

नेहमीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने काही भागांत ओला दुष्काळ निर्माण झाला आहे. ऑक्टोबर महिन्याची सुरुवातच परतीच्या मॉन्सूनने केली. दसरा झाला तरी पाऊस सुरूच असल्याने खरीप हंगामातील पिकांची काढणी अजूनही शेतकऱ्यांना करता आलेली नाही.

आणखी दोन दिवस पावसाचे

हवामान विभागाने मंगळवारपर्यंत (ता. ११) जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे अजूनही पाऊस थांबण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे खरीप पिकांची काढणी व पिकांची देखभाल हा शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

ऑक्टोबर महिन्यात

झालेला पाऊस (टक्केवारी)

नगर तालुका १२४.५

पारनेर १३३.९

श्रीगोंदे १४५.१

कर्जत १३९.४

जामखेड ९१.६

शेवगाव १२४.३

पाथर्डी १०५.६

नेवासे १३९.१

राहुरी १३२.६

संगमनेर १५२.४

अकोले १७७.२

कोपरगाव १५६.७

श्रीरामपूर ११७.८

राहाता १२८.५

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com