Nanded Rain : नांदेड जिल्ह्यातील ७९ मंडलात अतिवृष्टी

जिल्ह्यात मंगळवारी पहाटेपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे सोळापैकी पंधरा तालुक्यांसह तब्बल ७९ मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
Heavy Rain Nanded, Nanded rain news
Heavy Rain Nanded, Nanded rain newsAgrowon

नांदेड : जिल्ह्यात मंगळवारी पहाटेपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे (Heavy Rain) सोळापैकी पंधरा तालुक्यांसह तब्बल ७९ मंडलांत अतिवृष्टीची (Heavy Rainfall In Nanded) नोंद झाली आहे. यातील ५९ मंडलांत शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्याने खरिपातील पिकांची दाणादाण उडाली आहे. पावसाचा जोर अद्याप कायम असल्याने नदी-नाल्यांना पूर आला आहे. परिणामी, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.(Nanded rain news updates)

Heavy Rain Nanded, Nanded rain news
Rain Update : नांदेड जिल्ह्यातील तब्बल ३२ मंडलांत अतिवृष्टी

जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून सुरू झालेला पाऊस थांबायला तयार नाही. आठ तारखेनंतर पावसाचा जोर वाढला. यानंतर काहीसा मंदावलेला पाऊस मंगळवारी (ता. १२) पहाटेपासून जोरदार झाला तो अद्याप सुरू आहे. बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यातील १६ पैकी देगलूर वगळता इतर १५ तालुक्यांसह तब्बल ७९ मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. २५ मंडलांत १५० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तर ५९ मंडलांत शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे नदीकाठची पिके खरडून गेली आहेत. तर सखल भागातील शेतात पाणी साचून कोवळी पिके वाळत आहेत. या नैसर्गिक परिस्थितीवर जिल्हाधिकारी डॉ. विपिन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे लक्ष ठेवून आहेत.

Heavy Rain Nanded, Nanded rain news
Grape : पाऊस आणि वाढत्या आर्द्रतेमुळे द्राक्ष बागांवर डाऊनीचा प्रादुर्भाव

तालुकानिहाय झालेला सरासरी पाऊस

नांदेड १२४.८०, बिलोली १२७.९०, मुखेड ७९.३०, कंधार ९८.६०, लोहा १२१.८०, हदगाव १६४.५०, भोकर १६७.३०, देगलूर ५८.२०, किनवट १००.३०, मुदखेड १५२.४०, हिमायतनगर १८३.१०, माहूर ८६.४०, धर्माबाद १०९.५२, उमरी १५१.३०, अर्धापूर ११५.८०, नायगाव १३६.२०. एकूण सरासरी ११८ मिलिमीटर.

मंडलनिहाय झालेला पाऊस

हिमायतनगर १९६.५०, सरसम १९६.५०, जलधारा १९५, इस्लापूर १९५, हदगाव १८४.३०, लिंबगाव १८०.५०, तामसा १७३.५०, मुखेड १७०.३०, मातूळ १७०, किनी १७०, आष्टी १६८.५०, कुंटूर १६८, धानोरा १६५.८०, भोकर १६४.५०, मोघाळी १६४.५०, बारड १५९.८०, निवघा १५९, मनाठा १५९, पिपंरखेड १५९, जवळगाव १५६.३०, नाळेश्‍वर १५५.८०, बरबडा १५४.३०, कापसी १५३.५०, सिंधी १५३, उमरी १५०.८०, तळणी १४८.५०, नरसी १४३.५०, बिलोली १३६.८०, कुंडलवाडी १३६.८०, आदमपूर १३६.८०, लोहगाव १३६.८०, रामतीर्थ १३६.८०, गोळेगाव १३५.५०, माळेगाव १३१.५०, वसरणी १३०, तरोडा १२८, मुगट १२७, वाजेगाव १२४.५०, सिरजखेड १२१.३०, लोहा १२०.८०, सोनखेड १२०.८०, शेवडी १२०.८०, कलंबर १२०.८०, नांदेड शहर ११८.५०, वानोळा ११५, माजंरम ११२, उस्माननगर १११.५०, अर्धापूर १०८, दाभड १०८, विष्णुपुरी १०७.८०, कंधार १०६.८०, धर्माबाद १०५.५०, करखेली १०५.५०, जारीकोट १०५.५०, नायगाव १०३.३०, मुखेड १०३, जाहूर १०२.५०, चांडोळा १०२.५०, दिग्रस बुद्रुक १०१.५०, माहूर ९८.८०, खानापूर ९८.३०, तुप्पा ९७.८०, फुलवळ ९५.८०, पेठवडज ९५.८०, बारुळ ९५.८०, माळाकोळी ९३.८०, किनवट ८५, बोधडी ८५, सिंदगी ८५, सगरोळी ८३.३०, कुरुळा ८३.३०, नांदेड ग्रामीण ८१, आंबूलगा ७५.८१, येवती ७४.८०, जांब ७४.३०, शिवणी ७२.५०, देगलूर ७१.५०, वाई ६५.८०, सिंदखेड ६५.८०.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com