
Pune News : पुरंदर तालुका सीताफळ संघाची (Sitaphal Sangh) बैठक सासवड येथील शरद भवन येथे नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये पुढील ३ वर्षांसाठी कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
यावेळी संघाच्या अध्यक्षपदी नीलेश काळे यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष म्हणून संतोष म्हस्के यांची, तर सचिव म्हणून महेश लवांडे यांची निवड करण्यात आली आहे.
बैठकीला महाराष्ट्र कृषी, शिक्षण व संशोधन परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते, पुणे जिल्हा सीताफळ संघाचे उपाध्यक्ष शांताराम पोमण, महाराष्ट्र राज्य सीताफळ संघाचे सदस्य माउली मेमाणे, तात्यासाहेब काळे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
पुरंदर तालुक्यामध्ये सुमारे ३ हजार ५०० एकर क्षेत्र सीताफळासाठी उपलब्ध आहे. यातील पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे ५०० एकर क्षेत्रावर रसायनयुक्त खत, मुक्तशेती करण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला.
पुरंदर तालुक्यात अंजीर व सीताफळ संशोधन केंद्र स्थापन झाल्यास यश मिळेल, असा विश्वास मंगेश लवांडे यांनी व्यक्त केला.
पुरंदर तालुका सिताफळ संघाची कार्यकारिणी खालीलप्रमाणे
अध्यक्ष : नीलेश काळे, उपाध्यक्ष : संतोष म्हस्के, सचिव : महेश लवांडे, कार्यकारिणी सदस्य : संतोष जाधव, राजेंद्र गायकवाड, शरद दळवी, बाळासाहेब दाभाडे, विकास खटाटे, विजय कोंढाळकर, शरद शिवरकर, विठ्ठल कुंजीर, सतीश शिंदे, बाप्पू काळे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.