Bharatiya Kisan Mahasabha : भारतीय किसान महासभेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा विस्तार

महाराष्ट्रातील काकुस्ते, ढमाले, बावके यांची निवड
 Bharatiya Kisan Mahasabha
Bharatiya Kisan MahasabhaAgrowon



पुणे : अखिल भारतीय किसान (Bharatiya Kisan Mahasabha) महासभेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नऊ राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि तेरा राष्ट्रीय सचिवांची निवड करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातून श्रमिक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुभाष काकुस्ते (साक्री) यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष, सत्यशोधक शेतकरी सभेचे नेते किशोर ढमाले आणि श्रमिक शेतकरी संघटनेचे राजेंद्र बावके यांची राष्ट्रीय सचिवपदी निवड झाली आहे.

 Bharatiya Kisan Mahasabha
Kisan Sabha : राज्यभर किसान सभेचे आंदोलन

अखिल भारतीय किसान महासभेच्या (AIKM) राष्ट्रीय कार्यकारिणीची दोनदिवसीय बैठकीचा मंगळवारी समारोप झाला. या बैठकीत जय प्रकाश नारायण, प्रेमसिंग गेहलावत, सुभाष काकुस्ते, फुलचंद देवा, अरुण सिंग, मंजू प्रकाश, बी. एन. सिंग, शिवसागर शर्मा, कार्तिक पाल यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाली. तर तेरा राष्ट्रीय सचिवांचीही निवड करण्यात आली. यात पुरुषोत्तम शर्मा, ईश्‍वरी प्रसाद कुशवाह, अफरोज आलम, गुरनाम सिंग भिखी, सुदामा प्रसाद, चंद्र मोहन, राम आधार सिंग, राजकुमार यादव, जयतू देशमुख, डी. हरिनाथ, किशोर ढमाले, राजेंद्र बावके, रामचंद्र कुल्हारी यांचा समावेश आहे. राष्ट्रीय सचिवांमध्ये पुरुषोत्तम शर्मा यांच्याकडे प्रसिद्धीची, सुदामा प्रसाद यांच्याकडे संघटनेची आणि राम आधार सिंग यांच्याकडे वित्त विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

 Bharatiya Kisan Mahasabha
PM Kisan: भारतीय किसान संघाचा दिल्लीत मोर्चा

देशातील १८ राज्यातील ५० प्रमुख शेतकरी नेते या दोनदिवसीय बैठकीस उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ. रुल्दू सिंग मानसा होते. तर महासचिव राजा रामसिंग, ज्येष्ठ नेते देवेंद्रसिंह चौहान, फुलचंद धेवा, सुभाष काकुस्ते, जयप्रकाश आदी मान्यवर उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com