Grape Export : सांगलीतून ९ हजार टन द्राक्षे सातासमुद्रापार

जिल्ह्यात यंदा द्राक्ष पिकास नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला नाही. त्यामुळे द्राक्ष पीक चांगले असल्याने द्राक्ष निर्यातीस शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
Grape Export
Grape ExportAgrowon

Grape Market Update सांगली ः जिल्ह्यात यंदा द्राक्ष पिकास नैसर्गिक आपत्तीचा (Natural Calamity) फटका बसला नाही. त्यामुळे द्राक्ष पीक (Grape Crop) चांगले असल्याने द्राक्ष निर्यातीस (Grape Export) शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातून आज अखेर द्राक्षाची निर्यात ९ हजार ३६१ टन झाली आहे. निर्यातीचा हंगाम मध्यावर आला आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा द्राक्षाची निर्यातीत वाढ होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

जिल्ह्यातून युरोपसह आखाती देशात द्राक्षाची निर्यात मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे. तासगाव, खानापूर या दोन्ही तालुक्यांतील शेतकरी द्राक्षाची निर्यात करण्यासाठी पुढे येत आहेत. जिल्ह्यातून गतवर्षी ५ हजार ९४७ शेतकऱ्यांनी १६ हजार ३५८ टन द्राक्षाची निर्यात केली होती.

Grape Export
Grape Market : द्राक्ष व्यवहारात सौदा पावतीचा आग्रह करून फसवणूक टाळा

यंदाच्या हंगामात जिल्ह्यातून द्राक्षाची निर्यात वाढवण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये जागृती केली असून यंदाच्या हंगामात ९ हजार ५१५ शेतकरी द्राक्षाची निर्यात करत आहेत. हंगामाच्या प्रारंभी आखाती देशात द्राक्षाची निर्यात सुरु झाली. त्यानंतर शेतकऱ्यांनी युरोप देशात द्राक्ष निर्यातीस पुढाकार घेतला आहे.

यंदाच्या हंगामात युरोप देशात ३३९ कंटेनर म्हणजे ४ हजार ४२६ टन तर आखाती देशात ३०७ कंटेनर अर्थात ४ हजार ९३५ टन असे एकूण ६४६ कंटेनर म्हणजे ९ हजार ३६१ टन द्राक्षाची निर्यात झाली आहे.

Grape Export
Grape Farming : पावसामुळे द्राक्ष बागेवर काय परिणाम झाले?

युरोप देशापेक्षा आखाती देशात द्राक्षाची निर्यात अधिक होत असल्याचे कृषी विभागाने दिलेल्या अहवालातून दिसते आहे.

वास्तविक पाहता, आखाती देशापेक्षा युरोप देशात द्राक्षाची निर्यात तुलनेने कमी आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा द्राक्षाची निर्यात अधिक होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे

यंदा द्राक्ष पिकावर नैसर्गिक संकट आले नसल्याने पीक चांगले आहे. त्यामुळे द्राक्ष निर्यातीस चांगला प्रतिसाद मिळत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निर्यात वाढेल असा अंदाज आहे.

- प्रकाश नागरगोजे, कृषी अधिकारी (निर्यात) सांगली

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com