
कोल्हापूर : जिल्ह्यात २०२२-२३ साठी शासनाच्या एफएक्यू प्रतीच्या धाना (Paddy) (भात) करिता २०४० रुपये व रागी (Ragi) (नाचणी) करिता ३५७८ प्रतिक्विंटल दर जाहीर केला आहे. जे शेतकरी हमीभाव खरेदी केंद्रावर (MSP Procurement Center) नोंदणी करू शकले नाहीत ते रविवारपर्यंत (ता. १५) नाव नोंदणी करू शकतात, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रकांत खाडे यांनी पत्रकाद्वारे दिली.
राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने खरेदीचे काम पाहत असल्याचेही त्यांनी नमूद केले. ज्या शेतकऱ्यांना धान, नाचणी खरेदी केंद्रावर विक्री करायची आहे, अशा शेतकऱ्यांनी या खरेदी केंद्रावर नोंदणी करावी.
नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी चालू हंगाम २०२२-२३ मधील धान (भात), नाचणी पीक लागवडीची ऑनलाइन नोंद असलेला सातबारा, आधारकार्ड व बँक पासबुक झेरॉक्सची आवश्यकता आहे. शेतकरी नोंदणीची मुदत १५ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.
माहितीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर, गडहिंग्लज अथवा जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय, शाहू मार्केट यार्ड येथे संपर्क साधावा, असेही खाडे यांनी कळविले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.