Rain Updates: दहा मंडलांत अतिवृष्टी; ८२ मंडलांत मुसळधार

पुरामुळे शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. रस्ते, पूल वाहून गेले. जनावरे दगावली. वीजपुरवठा खंडित झाला. घरांची पडझड झाली. लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ (Water Storage) झाली आहे.
Extremely Heavy Rain
Extremely Heavy RainAgrowon

परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८२ मंडलांमध्ये गुरुवारी (ता. १४) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील १० मंडलांत अतिवृष्टी (Extremely Heavy Rain) झाली.

गेल्या आठवडाभरापासून पावसाची रिपरिप सुरू आहे. ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पुरामुळे शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. रस्ते, पूल वाहून गेले. जनावरे दगावली. वीजपुरवठा खंडित झाला. घरांची पडझड झाली. लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ (Water Storage) झाली आहे.

परभणी जिल्ह्यातील सर्व ५२ मंडलांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी २९.६ मिमी, जुलै महिन्यात आजवर २२५ मिमी, तर १ जूनपासून एकूण सरासरी ३६२.४ मिमी पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील ३० मंडलांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली, कळमनुरी, सेनगाव तालुक्यांतील १० मंडलांत अतिवृष्टी (Extremely Heavy Rain) झाली. जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये सरासरी ५९.४ मिमी, जुलै महिन्यात आजवर ३४७.४ मिमी, तर १ जूनपासून एकूण ४६९.१ मिमी पाऊस झाला.

६५ मिमीपेक्षा जास्त पावसाची मंडले

हिंगोली ८०.८, सिरसम ७५.३, डिग्रस कऱ्हाळे ६५.५, माळहिवरा ८४, कळमनुरी ७८, वाकोडी ९७, नांदापूर ८६.५, आखाडा बाळापूर ६८.८, डोंगरकडा ६६.५, येळेगाव ७६.५.

मंडलनिहाय पाऊस (२५ मिमीच्या पुढे)

परभणी जिल्हा ः पेडगाव २६.५, जांब २६.५, दैठणा २८.३, परभणी ग्रामीण २५.८, आडगाव ३९, दूधगाव २५.८, सेलू २८, देऊळगाव २८, चिकलठाणा २६.८, मानवत ३५, केकरजवळा ३७.५, कोल्हा ४३.८, ताडबोरगाव ४६.३, रामपुरी ३५, पाथरी ४२.५, बाभळगाव ३५, आवलगाव २५.३, वडगाव ३८.८, गंगाखेड २८, महातपुरी ३५, माखणी ४०.८, राणीसावरगाव ३७, पिंपळदरी ४०.८, पालम २८, चाटोरी ३६.३, बनवस ३६.३, पेठशिवणी ३२.५, रावराजूर ३२.८, पूर्णा ३२.८, ताडकळस २५, लिमला २५.८, कात्नेश्वर ३२.८, चुडावा ३८.३, कावलगाव ३५.३.

हिंगोली जिल्हा ः

नरसी नामदेव ६३.३, बासंबा ५३.५, खंबाळा ६३.३, वारंगा ६०, वसमत ४७.८, आंबा ५८.३, हयातनगर ४५.८, गिरगाव ६२.३, हट्टा ३२.८, टेंभुर्णी ४०.५, कुरुंदा ५८.३, औंढा नागनाथ ५९.५, साळणा ५९.५, जवळा बाजार ४६.३, सेनगाव ३३.५, गोरेगाव ५८, आजेगाव ४६.५, साखरा ३२.८, पानकनेरगाव ४१.८, हत्ता ४१.१.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com