नजरा नव्या कुलगुरूंकडे

विद्यमान कुलगुरू डॉ. विलास भाले यांचा कार्यकाळ नियमानुसार पुढील महिन्यात संपत आहे. हा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी ते वयोमानानुसार ५ सप्टेंबरला सेवानिवृत्त होतील.
Agriculture
Agriculture Agrowon

अकोला ः संपूर्ण विदर्भाचे कार्यक्षेत्र असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या (Dr. Panjabrao Deshmukh Agriculture University) कुलगुरुपदाची (Vice Chancellor) मुदत पुढील महिन्यात संपत आहे. त्यामुळे या पदावर नव्या व्यक्तीची निवड केली जाणार आहे. या निवडीच्या अनुषंगाने प्रक्रिया सुरु झालेली आहे. पदासाठी इच्छुकांचे अर्ज दाखल झाले आहेत. २९ ऑगस्टनंतर अंतिम पाच जणांचे अर्ज मुलाखतीसाठी राज्यपाल भवनाकडे पाठवले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर अंतिम निवड राज्यपालांमार्फत (Governor) जाहीर केली जाणार आहे.

Agriculture
Rain fed Agriculture : कोरडवाहू शेती विकासासाठी नवे धोरण

विद्यमान कुलगुरू डॉ. विलास भाले यांचा कार्यकाळ नियमानुसार पुढील महिन्यात संपत आहे. हा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी ते वयोमानानुसार ५ सप्टेंबरला सेवानिवृत्त होतील. त्यामुळे या पदासाठी जून महिन्यात शोध समितीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु केली. आलेल्या अर्जांमधून पात्र असलेल्या पाच जणांची नावे राजभवनातील मुलाखतीसाठी आता पाठवली जातील.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला विद्यापीठातील चार ते पाच जणांनी अर्ज केलेले आहेत. या शिवाय इतर विद्यापीठांमधून तसेच केंद्रीय विद्यापीठ, संस्थांच्या शास्त्रज्ञांनीही अर्ज दाखल केले आहेत. यामुळे कुलगुरुपदाची चुरस वाढू लागली आहे. निवडीमध्ये गेल्या वेळेप्रमाणे स्थानिक उमेदवाराला प्राधान्य दिले जाते की, नुकत्याच परभणीमध्ये केलेल्या निवडीप्रमाणे इतर ठिकाणच्या उमेदवाराला पसंती दिली जाते, याचीच उत्सुकता ‘पंदेकृवि’मध्ये आहे. ही प्रक्रिया राबवण्यासाठी शोध समितीचे नोडल अधिकारी म्हणून डॉ. एन. पी. साहू हे काम सांभाळत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com