Maharashtra Political Crisis: फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री व्हावं : जे. पी. नड्डा

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या घोषणेनंतर भाजपच्या (BJP) केंद्रीय नेत्यांनी आता फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
J P Nadda
J P NaddaAgrowon

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राजभवनात एकनाथ शिंदे (Eknatha Shinde) हे मुख्यमंत्री होतील. संध्याकाळी एकनाथ शिंदे हेच पदाची शपथ घेतील, असेही फडणवीस यांनी सांगितले होते. देवेंद्र यांच्या घोषणेनंतर भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी आता फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी माध्यमांशी संवाद साधत हा आग्रह धरला आहे.

भाजपचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मनाचा मोठेपणा दाखवत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील आणि आपण सरकारबाहेर राहून या सरकारला समर्थन देऊ असे सांगितले.

फडणवीस यांचे हे वर्तन भाजपच्या संस्कृतीचे दर्शन घडते. त्यांच्या कृतीमधून आम्ही पदासाठी नव्हे तर विचारांसाठी काम करत असल्याचे समोर येते. मात्र महाराष्ट्राच्या विकासासाठी, सर्वसामान्य जनतेच्या आकांक्षा पूर्ततेसाठी फडणवीस यांनी असा निर्णय जाहीर केला.

नंतर देवेंद्र यांनी या सरकारमध्ये सहभागी व्हावे, असा निर्णय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे. पक्षाने त्यांना तशी सूचना केल्याचेही नड्डा म्हणाले.

त्यामुळे आता फडणवीस शिंदे यांच्यासोबत या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, अशी चर्चा सुरू आहे.

देवेंद्र फडणवीसांनी जनतेच्या हितासाठी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. फडणवीसांच्या या निर्णयामागे त्यांचे महाराष्ट्रावरील प्रेम आणि निष्ठा असल्याचे ट्विट भाजपाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com