वर्धा जिल्ह्यात काढली बनावट पैसेवारी?

शेतकरी बचाओ आंदोलनाचा आरोप
Wardha
Wardha Agrowon

वर्धा ः खरीप हंगामात संततधार पाऊस व अतिवृष्टीने (Heavy Rainfall) पिकाचे नुकसान (Crop Damage) झाले. त्याचे सर्व्हेक्षण व पंचनामे होत मदत निधी जाहीर झाला. त्याचवेळी गावातील सरपंच आणि शेतकऱ्यांना वगळून बनावट पैसेवारी काढण्यात आल्याचा आरोप शेतकरी बचाओ आंदोलनाचे संयोजक भाई रजनीकांत यांनी केला आहे.

Wardha
Cotton Market : कापूस बाजार अद्यापही दबावात का?

खरीप हंगामाच्या सुरुवातीला मॉन्सूनने हुलकावणी दिली. परिणामी, पाऊस येईल या आशेवर लागवड करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांवर दुबार-तिबार पेरणीची वेळ आली. त्यानंतर जुलैपासून पावसाची संततधार कायम राहिली. जिल्ह्याच्या अनेक भागांत अतिवृष्टीची नोंद झाली. काही भागांत जमीन खरडून गेली. शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. याची दखल घेत शासनाने सर्व्हेक्षण व पंचनामे करून मदत निधी जाहीर केला. परंतु आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता तातडीच्या मदतीचा विचार राज्यकर्त्यांकडून अपेक्षित असतो, असे भाई रजनीकांत यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Wardha
Soybean Rate : सोयाबीन बाजाराला पामतेलाचा आधार

निधी जाहीर झाला असला तरी तो आणि पीकविमा भरपाईदेखील अद्याप मिळाली नाही. दुष्काळी जिल्हा जाहीर करून विविध प्रकारच्या सवलती मिळणे अपेक्षित होते. सर्व प्रकारच्या वसुलीला स्थगिती मिळणेही क्रमप्राप्त होते. परंतु विदर्भात सक्षम आणि दबाव गट असलेले नेतृत्व नसल्याने शेतकऱ्यांच्या व्यापक हिताकडे आजवर झाले त्याप्रमाणे या वेळी देखील राज्यकर्त्यांकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप भाई रजनीकांत यांनी केला आहे.

जिल्ह्याचे पालकत्व खुद्द उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असताना हे घडले आहे. पिकाची दयनीय अवस्था असलेल्या नजरपीक पैसेवारी १५ ते २० असणे अपेक्षित होती. परंतु सरपंच, सेवा सोसायटी अध्यक्ष व तीन शेतकरी प्रतिनिधी असणाऱ्या ग्राम पीक समितीच्या बैठकीला, पीक पाहणी शिवार फेरीला महसूल कर्मचाऱ्यांनी डावलत बनावट ४६ पैसे इतके पैसेवारी काढली. शेतकरी बचाओ आंदोलनाने गावभेटीत अनेक सरपंचांशी संवाद साधला. त्या वेळी हा गंभीर प्रकार समोर आल्याचेही त्यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com