
कोल्हापूर : महिलांनी दुग्धप्रक्रिया (Dairy Processing) व प्रक्रियायुक्त पदार्थ (Processed Food) उत्पादनातून स्वयंरोजगाराच्या (Self Employment) संधी प्राप्त करून घेऊन आपली व कौटुंबिक आर्थिक प्रगती साधावी, असे प्रतिपादन येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांनी केले.
नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या अनुसूचित जाती कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत कृषी महाविद्यालयाच्या कृषी विस्तार व संज्ञापन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दूध व दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. सूर्यवंशी बोलत होते.
भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या अनुसूचित जाती कौशल्य विकास कार्यक्रमाचे महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. शैलेंद्र कांबळे यांनी दुग्धप्रक्रिया उद्योगाचे महत्त्व सांगितले. महाविद्यालयाच्या कृषी विस्तार व संज्ञापन विभागाचे प्रमुख डॉ. भारत कोलगणे यांनी त्यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयाच्या विस्तार गटामार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषी विस्ताराच्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली.
महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. ज्ञानेश्वर पतंगे यांनी दूध व दुग्धप्रक्रिया पद्धती तसेच शास्त्रीय पद्धतीने सुगंधी दूध, लस्सी, श्रीखंड व पेय निर्मिती तर सहायक प्रा. डॉ. चंदाराणी मेमाणे यांनी पनीर, रसगुल्ला, खवा व बासुंदी निर्मितीसह क्रीम सेपरेटरवर माहिती दिली.
महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष व पशू व दुग्धशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. शिवाजीराव पाचपुते, विस्तार विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. हृषीकेश सोनावणे, सहायक कूलसचिव उत्तम गाताडे, सहायक नियंत्रक नागेश यलगुलवार, विस्तार गटाचे सहायक बाबूराव आवळे, डॉ. संदीप पाटील, नेज गावचे प्रगतिशील शेतकरी संदीप कांबळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन कृषी विस्तार विभागाचे सहायक प्रा. डॉ. प्रवीण खराडे यांनी केले. आभार प्रा. डॉ. मुकुंद गुंड यांनी मानले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.