Rural Road Issue : पाणंद रस्त्यांच्या कामांना ‘ब्रेक’

मुदखेड तालुक्यातील बारड, जवळा मुरार, डोंगरगाव आदी गावांत मातोश्री पाणंद रस्त्याला मंजुरी मिळाली आहे.
Rural Development
Rural DevelopmentAgrowon

मुदखेड, जि. नांदेड : मुदखेड तालुक्यात मंजुरी मिळालेल्या मातोश्री पाणंद रस्त्याची कामे (Farm Road Work) जोमात चालू असतानाच एकाएकी कामांना ब्रेक लागल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात असताना ३३ फुटांचे पाणंद रस्ते (Panand Road) वीस फुटांच्या आतच बनत असल्याने तसेच अकुशल कामांची बिले पास करण्यासाठी मस्टर नोंद रोजगाराची शोधाशोध सुरू असून कामांना लागलेल्या ब्रेकमुळे शेतकरी वर्गात मोठा रोष निर्माण झाला आहे.

मुदखेड तालुक्यातील बारड, जवळा मुरार, डोंगरगाव आदी गावांत मातोश्री पाणंद रस्त्याला मंजुरी मिळाली आहे. शासनाने ३३ फुटांच्या पाणंद रस्त्याला एक किलोमीटरसाठी २३ लक्ष रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे.

परंतु प्रत्यक्षात मात्र वीस फुटांच्या आताच पाणंद रस्ते होताना दिसत आहेत. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून या कामांना मंजुरी मिळाली असल्याने गाव व परिसरातील रोजगारांना रोजगार उपलब्ध करून आवश्यक आहे.

या कामात साठ टक्के कामे अकुशल म्हणजेच रोजगाराच्या माध्यमातून पूर्ण करणे कायद्यानुसार बंधनकारक आहे तर चाळीस टक्के कामे कुशल रोजगाराच्या माध्यमातून करण्यास अनुमती आहे.

परंतू सर्वच पाणंद रस्त्याच्या कामात मोठी धांदल असून केवळ यंत्राच्या सहाय्याने कामे करून मस्टरवर बोगस नोंदी दाखवून बिले पास करण्याचा खटाटोप सुरू असल्याचे बोलले जात आहे. पाणंद रस्त्यावर गिट्टी अंथरून काम बंद केल्याने शेतमाल वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Rural Development
Pune Ring Road : रिंगरोडला मावळ, मुळशीत ‘वेग’

‘मोजमाप’ पुस्तिकेत नेमकी कोणती नोंद होणार ?

पाणंद रस्त्याची कामे सुरू झाल्याने शेतमाल दळणवळणाचा मार्ग सुकर होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. यापूर्वी पाणंद रस्त्यावरील शेतकऱ्यांनी एकत्रित येत लाखो रुपयांचा मुरूम अंथरला होता.

परंतु याचा मोबदला गुत्तेदार यंत्रणा उचलण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच आजच्या घडीला तेहतीस फुटांचे पाणंद रस्ते नाल्यासह केवळ वीस फुटातच आटोपून ३३ फुटांच्या पाणंद रस्त्याचे बिले उचलण्याचा घाट घातला आहे.

यामध्ये तालुक्यातील प्रशासन, लोकप्रतिनिधी सर्वच यंत्रणा जोमाने कामाला लागली असून केवळ वीस फुटांच्या पाणंद रस्त्यांची निर्मिती करून ३३ फुटांच्या निधीवर डोळा असल्याने ‘मोजमाप’ पुस्तिकेत नेमकी कोणती नोंद होणार ? हेच पाहणे महत्वाचे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com