FPC Mahaparishad : शेतकरी कंपन्या सहकाराचे नवे मॉडेल

‘ॲग्रोवन’च्या वतीने आयोजित पहिल्या एफपीसी (शेतकरी उत्पादक कंपनी) महापरिषदेमध्ये ‘सहकाराचं नवं मॉडेल’ या विषयावरील चर्चासत्रात श्री. ठोंबरे बोलत होते.
B. B. Thombare
B. B. ThombareAgrowon

पुणे ः शेतीमाल उत्पादन (Agriculture Production), प्रक्रिया ते विक्रीपर्यंतची मूल्यसाखळी (Production To Sale Value Chain) निर्माण करण्याची ताकद शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये (Farmer Producer Company) आहे. शिवाय त्यातून थेट शेतकऱ्यांना नफ्याचा वाटा मिळतो. या कंपन्यांच्या रूपानं खऱ्या अर्थाने सहकाराचं नवं मॉडेल (Cooperative Model) तयार होते आहे. पण त्यामध्ये राजकीय आणि शासकीय हस्तक्षेप टाळायला हवा असे मत नॅचरल शुगर्सचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे (B.B. Thombare) यांनी व्यक्त केले.

B. B. Thombare
FPC Mahaparishad : एफपीसींनो, धैर्याने लढा; विजय आपलाच

‘ॲग्रोवन’च्या वतीने आयोजित पहिल्या एफपीसी (शेतकरी उत्पादक कंपनी) महापरिषदेमध्ये ‘सहकाराचं नवं मॉडेल’ या विषयावरील चर्चासत्रात श्री. ठोंबरे बोलत होते. ‘इंडियन डेअरी असोसिएशन’चे संचालक चेतन नरके, ‘ॲग्रोवन’चे संपादक-संचालक आदिनाथ चव्हाण या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. श्री. ठोंबरे म्हणाले, की सहकारी आणि खासगी या दोन्ही संस्थांची तुलना केल्यास सहकारामध्ये स्वाहाकार वाढला.

मूलभूत तत्त्वे कमी होत गेली, कार्यक्षम व्यवस्थापन राहिले नाही. या संस्थांचा वापर वेगळ्या कामांसाठी करण्यात आला. बंधने असतील तर सहकारात संस्था टिकू शकणार नाहीत. नेमके तेच सहकारामध्ये झाले. आता केंद्र सरकारनं शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन दिलं आहे. पाच हजारांहून अधिक शेतकरी कंपन्या स्थापन झाल्या आहेत. सहकारातून ‘कार्पोरेट’ जगतात शेतकरी कंपन्या येत आहेत. महाराष्ट्रात ११२ खासगी साखर कारखाने आहेत. त्यांच्या माध्यमातून यंदा १६८ लाख टन गाळप झाले. त्यात ४५ टक्के वाटा खासगी कारखान्यांचा आहे. हे कारखाने म्हणजे शेतकरी कंपन्याच आहेत. सहकाराच्या तुलनेत खासगी कारखान्यांना निर्णय स्वातंत्र्यामुळे प्रगती करता आली हे वास्तव आहे, असेही श्री. ठोंबरे म्हणाले.

B. B. Thombare
FPC Mahaparishad : अन्नदात्याने ऊर्जादाते व्हावे

श्री. नरके म्हणाले, की देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. पण फार वर्षांपूर्वी सहकारानं बदल घडवून आणला. सहकार जिथं वाढला त्याच भागातील ‘जीडीपी’ वाढला, हे लक्षात येईल. सहकार ही चळवळ आहे, भावना आहे. त्यात भांडवलाची अडचण येत नाही. आज ‘मार्केट’ बदलते आहे. त्यातील ट्रेंड ही महत्त्वाचे आहेत. केवळ शेतीमाल विकण्याऐवजी मूल्यवर्धानावर भर द्यायला हवा. त्यातून किंमत वाढते. तुम्ही कशा पद्धतीने काम करता, ग्राहकांना काय पाहिजे आणि आम्ही काय देतो, याचा विचार केला पाहिजे, असेही श्री. नरके म्हणाले.

प्रास्ताविकात ‘ॲग्रोवन’चे संपादक-संचालक आदिनाथ चव्हाण म्हणाले, की शेतकरी कंपन्यांची चळवळ मोठी होत आहे. पण काही तांत्रिक अडचणी आहेत, निधीचे प्रश्‍न आहेत. त्यावर मंथन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. गेली काही वर्षे आम्ही या संकल्पनेवर काम करतो आहोत. काही शेतकरी कंपन्यांचे अनुभवही महत्त्वाचे आहेत. ‘सह्याद्री’सारखी जागतिक स्तरावरील कंपनी आपल्याकडे आहे. आज ‘कमोडिटी मार्केट’ वेगाने पुढे जात आहे. त्यात शेतकरी कंपन्यांना संधी आहे. अशा विविध विषयांवर महापरिषदेत चर्चा होणार आहे.

जैवइंधन निर्मितीत संधी

आज केंद्र सरकारनं जैवइंधनासाठी प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. आज पेट्रोल, डिझेल यांना इथेनॉल, जैवइंधन तर ‘सीएनजी’ला ‘बायोसीएनजीचा पर्याय आहे. त्यात साखर उद्योगाने मोठा भार उचलला आहे. केवळ इथेनॉल निर्मितीमुळे साखर कारखाने आर्थिकदृष्ट्या प्रगती करू शकले आहेत. आज पेट्रोलमध्ये पाच टक्क्यांवरून जवळपास १०.२५ टक्क्यांपर्यंत इथेनॅाल मिश्रण होते. साखर उद्योगातील टाकाऊ पदार्थ, नेपियर गवत यांसारख्या ऊर्जासाधनांचा वापर करून इंधनाची निर्मिती शक्य झाली आहे. यात शेतकरी उत्पादक कंपन्या उतरल्या तर मोठी संधी मिळू शकते. प्रत्येक तालुक्यात एक प्रकल्प असा उभा राहू शकतो, असेही श्री. ठोंबरे म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com