Kharif Season : एका महिन्यातील पावसानेच खरीप पिकांची माती

एक लाख ३५ हजार हेक्टरवर नुकसान; ‘कृषी’चा अहवाल
Kharif Season
Kharif SeasonAgrowon

नगर ः जिल्ह्यात एका सप्टेंबर महिन्यांत अतिवृष्टी (Heavy Rainfall) आणि सततच्या पावसाने ७१७ गावांतील २ लाख २३ हजार शेतकऱ्यांच्या १ लाख ३५ हजार हेक्टरवरील खरीप पिकांची (Kharif Crop) माती केली. सप्टेंबरमध्ये दहा तालुक्यांत मोठा फटका बसला. जूनपासून ऑगस्टअखेरपर्यंत १३०० हेक्टरचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व सततच्या पावसाने मोठी हानी केली आहे. या एकाच महिन्यात अतिवृष्टीने ३३ हजार ७२६ हेक्टर, तर सततच्या पावसाने एक लाख १ हजार ६३० हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले. दहा तालुक्यांत जादा पावसाने शेती पिकांचे नुकसान केले आहे. एकट्या कोपरगाव तालुक्यात ३२ हजार ६०६.२७ हेक्टरवरील पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. तर शेवगाव, पाथर्डी, कर्जत आणि जामखेड तालुक्यांतील पिके वाचली आहेत, असे कृषी विभागाच्या अहवालात नमूद आहे.

कृषी विभागाने गुरुवारी (ता. ३) नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला. त्यानुसार बाजरी, मका, सोयाबीन, कापूस आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नगर जिल्हा प्रशासनाकडून आतापर्यंत झालेल्या नुकसानीबाबत २९१ कोटी २५ लाखांची शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी राज्य सरकारकडे अहवाल पाठविला आहे.

कृषी विभागाच्या अहवालावरच शेतकऱ्यांना मदत मिळेल. त्यातील ४ कोटी २५ लाख रुपये मिळाले आहेत.
खरिपातील पिकांचे झालेले नुकसान शेतकऱ्यांना उद्‍ध्वस्त करणारे आहे. खरे तर दिवाळीआधी मदत मिळणे गरजेचे होते. आता तरी शासनाने शेतकऱ्यांना मदत करून रब्बीसाठी हातभार लावावा.

Kharif Season
Crop Advisory : हरभरा पीक सल्ला

- संभाजी दहातोंडे-पाटील, प्रदेशाध्यक्ष, शेतकरी मराठा महासंघ
तालुकानिहाय नुकसान (हेक्टर)
कोपरगाव ३२ हजार ६०६
राहुरी २७ हजार ६८४.१५
श्रीरामपूर २३ हजार २९४.६१
संगमनेर १७ हजार ८१५
राहाता १० हजार ३४२. ७९
नेवासा ९ हजार १११.७४
अकोले ४ हजार ७२८.८२
पारनेर २ हजार ११. ५२
श्रीगोंदा १ हजार ७६७.८६
नगर १ हजार ३५६.५.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com