शेतकरीच धावला शेतकऱ्यांच्या मदतीला

रस्ते, नाल्यातून पाणीच पाणी वाहतयं... मग पोरंबाळं शाळेत पाठवायची तरी कशी?, शेतात कसेबसे नाल्यातून पाणी तुडवतच जावे लागतेय. मात्र शेतकरी दावल आहिरे यांनी शेतातील उभे पीक आडवे करून तात्पुरता रस्ता केला.
Agriculture
AgricultureAgrowon

अंबासन, ता. सटाणा : ‘रस्ते, नाल्यातून पाणीच पाणी वाहतयं... मग पोरंबाळं शाळेत पाठवायची तरी कशी?, शेतात कसेबसे नाल्यातून पाणी तुडवतच जावे लागतेय. मात्र शेतकरी दावल आहिरे यांनी शेतातील उभे पीक आडवे करून तात्पुरता रस्ता केला. ते देवदूत होऊन धावून आल्याची भावना परिसरातील शेतकरी, विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

Agriculture
Horticulture : रोहयो’तील फळबाग लागवडीतील अडथळे कायम

तालुक्यात बहुतांश भागात पाऊस धो-धो बरसला आणि छोटे-मोठे बंधारे ओसंडून वाहू लागले. बऱ्याच ठिकाणी आजही नाले, रस्त्यांवर पाणी वाहत आहे. अंबासन परिसरातील वघाड, वाटोळी, पांझर,डोबले व कुमाऱ्यानाला दुथडी वाहत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शेतात वस्तीवरील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

Agriculture
Orange : संत्रा फळगळ अभ्यास समितीची बुधवारी बैठक

नाल्यातून जाता येत नसल्याने शेतीशिवारात पिकविलेला मालही शेतात पडून आहे. शेतात चाळीत साठवून ठेवलेला कांदाही सडू लागला आहे. ही परिस्थिती प्रगतिशील शेतकरी दावल आहिरे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी माणुसकीतून शेतातील उभे पीक आडवे केले. जेसीबीच्या साह्याने शेतकऱ्‍यांसाठी तात्पुरता रस्ता तयार करून दिला. त्यामुळे आमच्यासाठी देवदूत धावून आल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून नाल्यातून मुश्किलीने जात होतो. परिसरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. मात्र दावल आहिरे यांनी शेतातून रस्ता दिल्याने विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांची सोय झाली.
नंदलाल आहिरे, उपाध्यक्ष, सहकारी सोसायटी, अंबासन
शेतकरी, विद्यार्थी पाण्यातून जीवघेणी कसरत करून ये- जा करीत होते. यासाठी मी शेतातील पिकांकडे दुर्लक्ष करीत तात्पुरत्या स्वरूपात रस्ता दिला आहे.
दावल आहिरे, प्रगतिशील शेतकरी, अंबासन

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com