Farmer Issues : महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटले नाहीत

महाराष्ट्रातील जनतेने मागील ७० वर्षांच्या कालावधीत विविध पक्षांना नेतृत्व करण्याची संधी दिली. परंतु महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, विद्यार्थी, युवकांचे प्रश्‍न सुटले नाहीत.
Indian Agriculture
Indian Agriculture Agrowon

नांदेड : महाराष्ट्रातील जनतेने मागील ७० वर्षांच्या कालावधीत विविध पक्षांना नेतृत्व करण्याची संधी दिली. परंतु महाराष्ट्रातील शेतकरी (Farmers In Maharashtra), महिला, विद्यार्थी, युवकांचे प्रश्‍न सुटले नाहीत.

हे प्रश्‍न सोडविण्याची धमक भारत राष्ट्र समिती (बीआरएस) (Bharat Rashtra Samiti)मध्ये आहे. महाराष्ट्रासह देशातील विकासासाठी तेलंगणचे रोड मॉडेल (Telangana Road Model) आम्ही देऊ असे ‘बीआरएस’चे खासदार बी. बी. पाटील म्हणाले.

Indian Agriculture
Agriculture Issues : दांभिकतेच्या बुरख्याआड लपलेले सत्य

भारत राष्ट्र समितीच्या वतीने नांदेड येथे ५ फेब्रुवारी रोजी जाहीर सभेचे आयोजन केले आहे. या सभेला तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव उपस्थित राहणार आहेत. या संदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत खासदार पाटील बोलत होते.

या वेळी ते म्हणाले, की भारत राष्ट्र समिती विकासाच्या अजेंड्यावर महाराष्ट्रात जनतेला पर्याय उपलब्ध करून देणार आहे. आमच्या पक्षाचा उद्देश सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, महिला, विद्यार्थी, युवकांचे प्रश्‍न सोडवणे आहे.

Indian Agriculture
Agriculture Issues : बीनकामाचा सल्ला

कोणत्याही पक्षाला अथवा नेत्याला त्रास देणे नाही. केवळ अडचणीवर कशी मात करता येऊ शकते हे आम्ही तेलंगणमध्ये नऊ वर्षांच्या काळात दाखवून दिले आहे. ते आम्ही महाराष्ट्र आणि संपूर्ण देशात दाखविणार आहोत, असे पाटील यांनी सांगितले.

५ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे भारत राष्ट्र समिती पक्षाची पुढील वाटचाल आणि ध्येय याविषयी नांदेडच्या सभेत सविस्तर बोलणार आहेत. नांदेडने महाराष्ट्राला दोन-दोन मुख्यमंत्री दिले. परंतु शहराचा पाहिजे तसा विकास झाला नाही. येथील रस्ते, नाले, ड्रेनेज लाइन

असे अनेक मोठे प्रश्‍न अजूनही सुटलेले नाहीत.

जनतेला अपेक्षित विकास साधण्यासाठी आम्ही जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुकांमध्ये भारत राष्ट्र समितीच्या माध्यमातून पर्याय उपलब्ध करून देणार आहोत, असे ते म्हणाले.

या वेळी चेन्नूरचे आमदार बलका सुमन, बोधनचे आमदार शकील अहमद, माजी महापौर सिव्हिल सप्लायच रवींद्रसिंह, शेतकरी नेते माणिक जाधव, डॉ. दत्ता मोरे आदी या वेळी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com