Indrajit Bhalerao : शेतकरी कीर्तन महोत्सव हे क्रांतिकारी पाऊल

शेतकऱ्यांना न मागता कर्जमुक्ती देणारे जगद्‍गुरू तुकाराम महाराज यांच्या बिजेनिमित्त कान्नापूर (ता. धारूर, जि. बीड) या ठिकाणी ३ ते ९ मार्च दरम्यान परिसरातील १४ गावांनी मिळून शेतकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे.
Indrajit Bhalerao
Indrajit BhaleraoAgrowon

Beed News परळी वैजनाथ, जि. बीड : शेतकरी कीर्तन महोत्सव (Farmer Festival) हे क्रांतिकारी पाऊल असल्याचे मत प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव (Indrajit Bhalerao) यांनी व्यक्त केले.

शेतकऱ्यांना न मागता कर्जमुक्ती (Farmer Lona Waive) देणारे जगद्‍गुरू तुकाराम महाराज यांच्या बिजेनिमित्त कान्नापूर (ता. धारूर, जि. बीड) या ठिकाणी ३ ते ९ मार्च दरम्यान परिसरातील १४ गावांनी मिळून शेतकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे.

या शेतकरी कीर्तन महोत्सवाची सुरुवात आयुष्यभर शेतकऱ्यांच्या व्यथा-वेदना कवितेतून मांडणारे प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव, वारकरी कीर्तन परंपरेचा अविभाज्य भाग असणाऱ्या पखवाज या वाद्याला आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून देणारे उद्धवबापू आपेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.

कवी भालेराव म्हणाले, की समाजातील जागरूक व्यक्तींनी पुढाकार घेऊन अशा कीर्तन महोत्सवाचे आयोजन करणे ही बाब कौतुकास्पद आहे. हे सांगतानाच त्यांनी संत नामदेवांपासून, बसवेश्‍वर, चक्रधर ते संत तुकाराम यांच्यायपर्यंत सर्व संतांच्या वचनांचे प्रमाण देऊन आपल्या कर्तव्याला प्राथमिकता देणे हा विचार किती महत्त्वाचा हे लक्षात आणून दिले.

Indrajit Bhalerao
Agriculture Extension : कृषी विस्तारात शेतकऱ्यांची मदत घ्या

सध्याच्या पोटभरू परमार्थाबद्दल उद्धव बापू आपेगावकर यांनी शब्दांतून प्रहार केले. त्याच वेळी शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाचा शेतकऱ्यांनीच मोल-भाव करू नये, तो योग्य किमतीत खरेदी करावा, जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्या कामाचे योग्य मोल मिळेल, असा विचार पत्रकार गोविंद शेळके यांनी मांडला.

Indrajit Bhalerao
Agriculture Fraud News : किनवटच्या शेतकऱ्यांना ३३ लाखांचा गंडा

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हभप श्यामसुंदर महाराज सौन्नर यांनी केले. १४ गावच्या संयोजन समितीने पुढाकार घेऊन हा कीर्तन महोत्सव सुरू केलेला आहे. त्या वेळी पंचक्रोशीतील बहुसंख्य नागरिक व महिला उपस्थित होत्या.

९ मार्चपर्यंत हा कीर्तन महोत्सव चालणार असून, असेच उद्‍बोधक कार्यक्रम कीर्तन सुरू राहणार आहेत. याचा परिसरातील शेतकऱ्यांनी, आबालवृद्ध महिला, तरुण नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन समन्वय समितीचे ॲड. अजय बुरांडे यांनी केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com