Nashik News: बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकऱ्याने वाचविला स्वतःचा जीव

कुऱ्हेगाव येथील ज्ञानेश्वर शिंदे हे शेतकरी पट्टीच्या मळ्यात दिवसभर शेतात काम केल्यानंतर सायंकाळी अंधार पडायच्या वेळी घराकडे निघणार इतक्यात शेताच्या बांधावरील तणसाच्या गंजीआड दोन डोळे चमकले.
 leopard attacks in Nashik News
leopard attacks in Nashik NewsAgrowon

अस्वली स्टेशन, जि. नाशिक : वेळ संध्याकाळी सात वाजेची सूर्य मावळल्यानंतर अल्पशा प्रकाशात शेतीची कामे करून थकून भागून गेल्यावर घरी परतताना अचानक समोर बिबट्या (Leopard) आला.

मात्र, शेतकऱ्याने बिबट्याच्या तावडीतून (Leopard Attack) मोबाईल बॅटरीच्या साहाय्याने मोठ्या शिताफीने स्वतःची सुटका करून घेत साक्षात मृत्यूच्या दाढेतून स्वतःचा जीव वाचवला आहे.

घटनेची इगतपुरी तालुकाभरात चर्चा सुरू असून रब्बी पिकांसाठी पाणी (Rabi Crop Irrigation) देण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये दहशत असून तत्काळ पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे.

 leopard attacks in Nashik News
Leopard : गोदाकाठी बिबट्याचा वावर

कुऱ्हेगाव येथील ज्ञानेश्वर शिंदे हे शेतकरी पट्टीच्या मळ्यात दिवसभर शेतात काम केल्यानंतर सायंकाळी अंधार पडायच्या वेळी घराकडे निघणार इतक्यात शेताच्या बांधावरील तणसाच्या गंजीआड दोन डोळे चमकले.

क्षणभर वाटले मांजर असेल मात्र आकारावरून मांजर नसून बिबट्याच असल्याची खात्री पटली होती.

 leopard attacks in Nashik News
Leopard Attack : लेकरासाठी आईची बिबट्याशी झुंज

बिबट्या अगदी पाच ते सहा फुटांवर होता. त्याने मारलेल्या पायाचा पंजा थोडक्यात स्पर्श करून गेला इतक्यात बॅटरीच्या उजेडाने त्याचे डोळे दिपल्याने मी मागे सरकलो अन् आरडाओरडा केला. शेजारील शेतकरीही धावले बिबट्याने तितक्यात धूम ठोकली.

कुऱ्हेगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच निर्मला नामदेव धोंगडे, सदस्या सुशीला धोंगडे, स्वाती गव्हाणे, संतोष धोंगडे, जयराम गव्हाणे, ग्रामसेविका केदारे, भगवान धोंगडे, अनिल धोंगडे, गणेश धोंगडे, गोरख शिंदे, जगन शिंदे, केशव शिंदे, जगन धोंगडे, अशोक धोंगडे आदी ग्रामस्थांनी तत्काळ पिंजरा लावण्याची मागणी वनविभागाकडे केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com